भोपाळ : ३१ ऑक्टोबर रोजी पीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीवर गँगरेपची घटना समोर आली होती. या प्रकरणातील सर्व - चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
स्पेशल न्यायमूर्ती सविता दुब यांनी हा निर्णय सुनावलाय. प्रकरणाची गंभीरता आणि आरोपींवर लावण्यात आलेली कलमांना ध्यानात घेऊन सरकारी वकील रीना वर्मा आणि पीएन सिंह यांनी दोषींना जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली होती. या प्रकरणात तब्बल २८ जणांची साक्ष नोंदवण्यात आली.
दोषींना फाशीच्या शिक्षेची आमची मागणी होती... परंतु, न्यायालयानं सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया पीडित तरुणीच्या पालकांनी दिलीय.
या सामूहिक बलात्कार प्रकरणाला कोर्टानं 'रेअर ऑफ द रेअर' मानलंय. गोलू उर्फ बिहारी (२५ वर्ष), अमर उर्फ गुल्टू (२५ वर्ष), राजेश उर्फ चेतराम (५० वर्ष) आणि रमेश उर्फ राजू या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सगळे दोषी नैसर्गिक मृत्यूपर्यंत तुरुंगात राहणार आहेत. याशिवाय कोर्टानं वेगवेगळ्या कलमांखाली चारही दोषींना ३ ते ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला४य.
सामूहिक बलात्काराचं हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता.