नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुरूनानक जयंती प्रकाशपर्व निमित्त देशाला संबोधित केले आणि यादरम्यान त्यांनी मोठी घोषणा करत सुधारित कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यूपीच्या तीन दिवसीय दौऱ्यापूर्वी पीएम मोदींनी कृषी कायदे परत करण्याची घोषणा केली. पीएम मोदी आज तीन दिवसांच्या यूपीच्या दौऱ्यावर जाणार आहेत
पीएम मोदींनी तीनही सुधारित कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा
पीएम मोदी म्हणाले की, 'आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुधारित कृषी कायदे आणले होते. पण आम्ही प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही.'
मोदी म्हणाले की, 'कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी यांनाही कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द ( Repeal)करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू
आज मैं आपको, पूरे देश को, ये बताने आया हूं कि हमने तीनों कृषि कानूनों को वापस लेने का निर्णय लिया है।
इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, हम इन तीनों कृषि कानूनों को Repeal करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 19, 2021
गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच आता आंदोलनकर्त्यांनी आंदोलन परत घ्यावे. असं आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केले आहे.