SBIच्या 44 कोटी ग्राहकांना मोठा संदेश; तुमचं डेबिट कार्ड चोरी झालंय का?

Debit Cardच्या सुरक्षेसंदर्भात SBIने ग्राहकांसाठी एक व्हिडीयो तयार केला आहे.

Updated: Jul 22, 2021, 10:04 AM IST
SBIच्या 44 कोटी ग्राहकांना मोठा संदेश; तुमचं डेबिट कार्ड चोरी झालंय का? title=

मुंबई : तुम्ही SBIचे ग्राहक आहात? तर बँकेने तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश जारी केला आहे. तुमच्या Debit Cardच्या सुरक्षेसंदर्भात SBIने ग्राहकांसाठी एक व्हिडीयो तयार केला आहे. या व्हिडीयोच्या माध्यमातून बँकेने डेबिट कार्ट हरवल्यास तुम्ही ते कशा पद्धतीने ब्लॉक करू शकता याबाबत माहिती दिली आहे. 

कार्ड ब्लॉक करण्यासाठी SBIचा व्हीडियो

एसबीआयने या 1.25 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की, कसं तुम्ही तुमच्या मोबाइलवरूनच डेबिट कार्ड ब्लॉक करू शकता. इतकंच नाही तर रिल्पेस किंवा नवीन डेबिट कार्ड देखील मिळवू शकता. एसबीआयने सांगितलंय की, ग्राहकाला बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करावा लागेल. यानंतर, कार्ड ब्लॉक करण्यासाठी दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. लक्षात ठेवा तुमचा मोबाईल नंबर SBIमध्ये रजिस्टर असला पाहिजे. तसंच तुम्हाला तुमच्या डेबिट कार्टचा नंबर माहिती असणं गरजेचं आहे. 

कार्ड ब्लॉक झाल्यानंतर, आपल्या रजिस्टर मोबाइल नंबरवर एक एसएमएस येतो. यावर आपण कार्डची बदली ऑर्डर देखील देऊ शकता. ऑर्डर दिल्यानंतर, तो तुमच्या रजिस्टर पत्त्यावर पोहोचतो. यासाठी बँक तुमच्याकडून पैसे आकारातं.

नेट बँकींगद्वारे 

  • जर तुम्ही IVRद्वारे कार्ड ब्लॉक करू इच्छित नसल्यास इतर पर्याय देखील आहेत. एसबीआय वेबसाइटला भेट देऊन तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारे तुमचं एसबीआय कार्ड ब्लॉक देखील करू शकता.
  • सर्वप्रथम www.onlinesbi.com लॉग इन करा
  • 'ई-सर्व्हिसेस' मधील 'एटीएम कार्ड सर्व्हिसेस' अंतर्गत 'ब्लॉक एटीएम कार्ड' निवडा.
  • डेबिट कार्डशी जोडलेले खाते निवडा.
  • सर्व एक्टिव्ह आणि ब्लॉक केलेले कार्ड दाखवले जातील. तुम्हाला कार्डचे पहिले 4 आणि शेवटचे 4 अंक दिसेल.
  • तुम्हाला ब्लॉक करू इच्छित कार्डासह कार्ड ब्लॉक करण्याचे कारण निवडा. नंतर सबमिट करा
  • डिटेल्स वेरिफाय करून कन्फर्म करा.

SBI YONO एपद्वारे 

SBI YONO अॅपच्या मदतीने ग्राहक आपले एटीएम / डेबिट कार्ड ब्लॉक करू शकतात. यासाठी आपल्याला अ‍ॅपवर जावं लागेल. यानंतर सर्व्हिस रिक्वेस्ट पर्याय निवडा आणि त्यानंतर ब्लॉक एटीएम / डेबिट कार्ड निवडा. आपला इंटरनेट बँकिंग प्रोफाइल पासवर्ड टाका. आता ज्या खात्याशी कार्ड जोडलं गेलं आहे ते खातं निवडा. आता कार्ड नंबर निवडा. आणि कार्ड ब्लॉक करण्याचं कारण द्या.