Bipin Ravat | सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश; थरकाप उडवणारा व्हिडीओ

देशाचे सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूत क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे

Updated: Dec 8, 2021, 02:04 PM IST
Bipin Ravat | सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश; थरकाप उडवणारा व्हिडीओ

चेन्नई : तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये बुधवारी एक मोठा अपघात झाला आणि लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी तसेचअनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते आणि ते एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. अपघातानंतर तिघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, लष्कराच्या बाजूने अद्याप कोणतीही खात्री करण्यात आलेली नाही.

 

हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये 14 लोक होते आणि त्यात एक वरिष्ठ अधिकारी सामील होता. अपघातानंतर तिघांना वाचवण्यात यश आले असून सध्या बचावकार्य सुरू आहे. सध्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे, मात्र आतापर्यंत कोणत्या लोकांना वाचवण्यात आले आहे, याची माहिती लष्कराकडून देण्यात आलेली नाही.

Army Chief Bipin Rawat warns strict action in cases against corrupt