close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

असं लग्न कदाचित पहिल्यांदाच झालं असावं!

सगळ्या भावांनी चक्क हातांच्या पायघड्या घातल्या

Updated: Jun 16, 2019, 06:31 PM IST
असं लग्न कदाचित पहिल्यांदाच झालं असावं!

बिहार : बिहारमध्ये सध्या एका वेगळ्याच लग्नाची चर्चा सुरु आहे. बिहारमधील एका बहिणीच्या लग्नाला बहिणीचे चक्क २० भाऊ पोहोचले. हे लग्न पाहता पाहता सगळ्याच गावकऱ्यांचे डोळे पाणावले. 

बिहारमधलं हे सर्वसाधारण लग्न नाही. अशोक चक्र विजेते शहीद गरुड कमांडो ज्योति प्रकाश निराला यांच्या बहिणीचं हे लग्न होतं. बहिणीला भावाची उणीव जाणवू नये म्हणून त्यांच्या पथकातले डझनभर कमांडो लग्नासाठी पोहोचले. पाठवणीच्या वेळी या सगळ्या भावांनी शशिकला आणि तिच्या नवऱ्यासाठी चक्क हातांच्या पायघड्या घातल्या. या क्षणी सगळेच सदगदित झाले.

बिहारमधल्या बादीलडीहमधील कमांडो ज्योति प्रकाश निराला दोन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर शहीद झाले. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मरणोत्तर अशोकचक्र देऊन सन्मान करण्यात आला. ज्योती प्रकाश हे तीन बहिणींचे एकमेव भाऊ होते. म्हणूनच त्याच्या पथकातले २० कमांडो ज्योती प्रकाश यांच्या बहिणीच्या लग्नाला पोहोचले.  

या लग्नात सगळ्यांचेच डोळे पाणावले. असं लग्न अनेकांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं.