Bihar Train Accident : सोशल मीडियावर मनोरंजनासोबत अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक असाच हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ समोर आला आहे. वारंवार सांगून सुद्धा अनेक प्रवासी जीवाची पर्वा न करता धावती लोकल असो किंवा एक्स्प्रेस असो पकडण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये अनेक जण यशस्वी होता तर काही जणांना अपघात होतो. जीवापेक्षा ट्रेन महत्त्वाची का असा प्रश्न या घटनेनंतर पडतो. (bihar man falls on railway track Bihar Train Accident vidro viral trending now)
अशा घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वरच्या वर व्हायरल होत असतात. अशीच एक भयानक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारममधील बगाहा रेल्वे स्ठानकावरील एक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकतायेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेल्वे स्टेशनवर एक एक्स्प्रेस तुफान वेगाने धावताना दिसत आहे. काही लोक आणि पोलीस प्लॅटफॉर्मवरून खालच्या बाजूला बघताना दिसत आहे. रुळावर एक व्यक्ती पडलेला दिसत आहे. एक व्यक्ती रेल्वे रुळावर पडला आणि एक्स्प्रेस त्या माणसाच्या अंगावरून गेली. सुदैवाने यात हा व्यक्ती थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुळावर पडलेला व्यक्ती जेव्हा ट्रेन बिहारममधील बगाहा रेल्वे स्ठानकावर थांबली तेव्हा तो व्यक्ती शीतपेय आणि बिस्किटे घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरला. पण काही क्षणात ती ट्रेन सुटली आणि तो धावत ट्रेन पकडण्यास गेला आणि त्याचा तोल गेला आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्यला जागेत पडला. ही घटना पाहताच स्टेशनवर एकच खळबळ माजली. पोलिसांसह इतर प्रवाशी त्या तरुणाच्या मदतीला धावली.
पश्चिम चंपारण के बगहा स्टेशन पर ट्रेन पकड़ने के दौरान पटरियों पर #गिरा_शख्स
ऊपर से गुजर गई पूरी #ट्रेन, सही सलामत बच गया शख्स@RailwaySeva pic.twitter.com/SMKEQy0NUA
— Goldy Srivastav (@GoldySrivastav) September 30, 2023
त्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. तर 24 वर्षीय हा तरुण बेतियाच्या उत्तरवारी पोखरा भागातील रहिवासी आहे. तर हा व्हिडीओ ट्विटर म्हणजे X वरील Goldy Srivastav या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.