साप चावला म्हणून माणसाने त्याच सापाला पकडून घेतला चावा! आणि तो वाचला...

बिहारमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. साप चावल्यानंतर तरुणाने त्याच सापाचा चावा घेतला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 6, 2024, 06:18 PM IST
साप चावला म्हणून माणसाने त्याच सापाला पकडून घेतला चावा! आणि तो वाचला... title=

Bihar Man Bites Snake : सर्पदंश म्हणजे मृत्यूशी गाठ. बिहार मध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. एका तरुणाला साप चावला. यानंतर संतापाच्या भरात तरुणाने त्याच सापाला चावा घेतला. यानंतर जे घडलं ते याची कुणी कल्पनाही केली नसेल. या घटनेची संपूर्ण देशभरात चर्चा सुरु आहे. 

मंगळवारी रात्री बिहारमधील नवादा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. राजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलव्याप्त भागात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी उशिरा सर्व कामगार त्यांच्या बेस कॅम्पमध्ये झोपले होते. यावेळी संतोष लोहार नावाच्या मजुराला सर्पदंश झाला.  यानंतर संतप्त झालेल्या संतोष याने लोखंडी रॉडच्या साहाय्याने सापाला पकडले.  सापाला पकडल्यानंतर संतोष याने सापाला तीन वेळा चावा घेतला. यानंतर सापासह जे घडलं ते पासून सगळेच अचंबित झाले.

सापाचा मृत्यू 

संतोष याने सापाला तीन वेळा चावा घेतल्यानंतर सापाचा मृत्यू झाला. माणसाने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेत सापाचा मृत्यू झाला असला तरी संतोषला काहीच झालेले नाही. तो सुखरुप आहे. सापाचा दंश झाल्याने माणसाचा मृत्यू होतो. मात्र, इथं माणसाने सापाचा चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाला आहे. 

माणसाने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू का झाला?

माणसाने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. संतोष लोहार हा मुळचा झारखंड राज्यातील लातेहार जिल्ह्यातील पांडुका येथील रहिवासी आहे. संतोष लोहार याला सर्पदंश होताच तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला काहीच झाले नाही. मात्र,  संतोष लोहार याला ज्या सापाने चावा घेतला त्याच सापाला त्याने तीन वेळा चावा घेतला. या घटनेत संतोषचा नाही तर सापाचा मृत्यू झाला आहे. सापाचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. सर्पदंशापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी संतोष याने भन्नाट अघोरी उपाय सांगितला. या उपाय म्हणजे पुन्हा सापाला दंश करणे. सापाने चावा घेतल्यानंतर त्याच सापाला दोन ते तीन वेळा दंश केल्यानंतर शरीरात सापाचे विष पसरत नाही आणि आपला जीव वाचतो असे संतोषने सांगितले. विषारी सापाने दंश केल्यानंतर संतोषने त्या सापाला चावा घेतला. यानंतर काही वेळातच सापाचा मृत्यू झाला.