कानपूर : कामासाठी निघालेल्या मजुरांवर नियतीनं घात केला. ट्रकचं नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. या भीषण अपघातात 8 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
ट्रकचं नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये 8 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील जलालगढ भागात घडली आहे.
राष्ट्रीय महामार्ग 57 जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत मजूर राजस्थानचे असल्याची माहिती मिळाली आहे. ट्रकमध्ये लोखंडी पाईप आणि मजूर होते. ट्रक उलटल्याने लोखंडी पाईप मजुरांच्या अंगावर पडले. त्यामुळे मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 8 जमूर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रक ड्रायव्हरला गाडी चालवताना डोळा लागला आणि त्यामुळे हा अपघात झाला. या ट्रकमध्ये बोअरवेलचे पाईप असल्याचं सांगितलं जात आहे. दुर्घटनेनंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे.
Bihar | Eight labourers died in Jalalgarh Police Station area of Purnia after a truck loaded with scrap lost balance and overturned here this morning. All the labourers belonged to Rajasthan. The truck carried 16 labourers and was going from Agartala (Tripura) to Jammu. pic.twitter.com/jZzJVww5tY
— ANI (@ANI) May 23, 2022