Serial Kisser Gang : 'या' व्यक्तीपासून सावधान! हा आहे 'सिरियल किसर', जो महिलांना रस्त्यावर पकडून जबरदस्तीने करतो Kiss

Bihar Serial Kisser Video : हा तोच आहे, ज्यामुळे महिल आणि तरुणींनी घराबाहेर निघणं बंद केलं होतं. कारण हा महिला आणि तरुणांना एकटं पाहून त्यांचावर हल्ला करायचा. त्यांना जबरदस्ती लिप लॉक करायचा आणि फरार व्हायचा...

Updated: Mar 22, 2023, 02:22 PM IST
Serial Kisser Gang : 'या' व्यक्तीपासून सावधान! हा आहे 'सिरियल किसर', जो महिलांना रस्त्यावर पकडून जबरदस्तीने करतो Kiss
bihar serial kisser finally arrested forcibly kissing woman video viral on Social media Crime News in marathi

Bihar Serial Kisser Video : ज्या व्यक्तीमुळे महिला आणि तरुणी थरथर कापत होत्या, घराबाहेर पडण्यास घाबरत होत्या तो नराधमाची ओखळ पटली आहे. हॉस्पिटल बाहेर फोनवर (Bihar Serial Kisser Viral Video) बोलत असलेल्या महिलेला जबदरस्ती चुंबन घेणाऱ्या सिरियल किसरला अटक करण्यात आली आहे. तो महिला किंवा तरुणींना एकटं पाहून त्यांचावर झडप घालायचा आणि जबदरस्ती त्यांचा ओठावर चुंबन घ्यायचा. 

बिहारमधील महिलेला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलांची झोप उडाली होती. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांसमोर या सिरियल किसरला जेरबंद करण्याचं आव्हान उभं राहिलं. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नराधमाला शोधण्याची मोहीम हाती घेतली. (bihar serial kisser finally arrested forcibly kissing woman video viral on Social media Crime News in marathi)

धक्कादायक खुलासे

हा व्यक्ती एकटा नव्हता तर सिरियल किसर टोळी होती. हॉस्पिटल बाहेर महिला किस करणारा ज्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्यक्ती हा या गँगचा म्होरक्या होता. ही टोळी महिलांची विनयभंग, मारहाण आणि चोरी करायचे. या म्होरक्याचं नाव मोहम्मद अक्रम असं आहे. रविवारी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे एका ठिकाणी छापा टाकला तेव्हा या टोळीचा पदार्फाश झाला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्रम आणि त्याच्या टोळीचे सदस्य अनेक महिन्यांपासून या भागात सक्रिय असून रस्त्यावर एकट्या फिरणाऱ्या महिलांना लक्ष्य करायचे. ही टोळी त्यांच्या बळींचा पाठलाग करायची आणि नंतर जबरदस्तीने त्यांचं चुंबन घ्यायचे. विनयभंगाबरोबरच चोरी, छोटय़ा दरोडय़ांच्या घटनांमध्येही या टोळीचा सहभागी होती. 

दिवसाढवळ्या एका महिलेचे जबरदस्तीने चुंबन घेत असलेल्या अक्रमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. पीडित महिला चतुर्थ श्रेणीतील आरोग्य कर्मचारी असून ती बिहारमधील जमुईमधील सदर रुग्णालयात कार्यरत होती. ही घटना 10 मार्च 2023 ची होती.