जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर गेली, ट्रेनची वाट बघत गाढ झोपली, पुढे घडलं असं काही... Video व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर गेली आणि ट्रेनची वाट बघता बघता रेल्वे रुळावरच गाढ झोपली, या घटनेने ट्रेनचा चांगलाच खोळंबा झाला. 

राजीव कासले | Updated: Sep 11, 2024, 02:28 PM IST
जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर गेली, ट्रेनची वाट बघत गाढ झोपली, पुढे घडलं असं काही... Video व्हायरल title=

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर (Railway Track) गेली आणि ट्रेनची वाट बघता बघता रेल्वे रुळावरच गाढ झोपली, या घटनेने ट्रेनचा चांगलाच खोळंबा झाला. बिहारच्या (Bihar) मोतीहारी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. रेल्वे रुळावर मुलीला झोपलेलं पाहून ट्रेनच्या मोटरमनने इमरजन्सी ब्रेक दाबला आणि ट्रेन त्या मुलीच्या अगदी जवळ जाऊन थांबली. मोटरमनच्या सतर्कतेमुळे त्या मुलीचा जीव थोडक्यात बचावला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक मुलगी झोपलेली दिसत आहे. तर तिच्या अगदी जवळ ट्रेन थांबलेली दिसतेय. मोटरमनने ट्रेन थांबवली आणि खाली उतरुन त्या मुलीला हाताला धरुन उठवलं. गाढ झोपेत असलेली ही मुलगी उठल्यानंतर थोडा वेळ नेमकं काय घडतंय हेच त्या मुलीला कळलं नाही. पण लोकांनी ओरड्यानंतर तिला जाग आली. त्यानंतर स्थानिक लोकांनीही त्या ठिकाणी गर्दी केली. स्थानिक महिलांच्या मदतीने त्या मुलीला रेल्वे रुळापासून दूर करण्यात आलं.

मुलीने केला आरडाओरडा

पण ज्यावेळी स्थानिक महिलांनी रेल्व रुळावरुन तिला बाहेर काढलं त्यावेळी सहकार्य करण्याऐवजी ती मदत करणाऱ्या महिलांच्या अंगावरच ओरडू लागली. मला जीव द्यायचा आहे, तुम्हाला काय करायचं आहे. मला सोडा अशी आरडाओरड ती करताना व्हिडिओत दिसतेय. पण महिलांनी तिला घट्ट धरून ठेवलं. त्यानंतर त्या मुलीची समजूत काढत तिला तिच्या घरी सुरक्षित रित्या पोहचवण्यात आलं.

मुलीने जीव देण्यासारखा टोकाचा निर्णय का घेतला याचं कारण समजू शकलेलं नाही. ट्रेनमधल्या सहाय्यक मोटरमनने आपल्या मोबाईलमध्य ही सर्व घटना कैद केली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.