देशातील 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लू, 6 राज्यांमध्ये पोल्ट्री बाजारपेठ बंद

केंद्र सरकारने बर्ड फ्लूसंदर्भातील वैज्ञानिक सल्ला लागू करण्याची विनंती राज्यांना केली आहे.

Updated: Jan 12, 2021, 10:29 AM IST
देशातील 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लू, 6 राज्यांमध्ये पोल्ट्री बाजारपेठ बंद title=

मुंबई : बर्ड फ्लू देशातील 10 राज्यात पसरला आहे. दिल्लीसह सहा राज्यांनी पोल्ट्री बाजारपेठ बंद केली आहे. तसेच त्यांच्या वाहतुकीवर ही बंदी घातली आहे. ही गोष्ट गांभिर्याने घेत केंद्र सरकारने बर्ड फ्लूसंदर्भातील वैज्ञानिक सल्ला लागू करण्याची विनंती राज्यांना केली आहे. यामध्ये बर्ड फ्लूचा विषाणू मनुष्यात चिकन किंवा अंडीच्या माध्यमातून पसरत नाही असं म्हटलं आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धमंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, स्थलांतरित पक्ष्यांकडून होणारा विषाणू काही ठिकाणी पाळीव पक्षींमध्येही पसरला आहे. सरकारने यासंदर्भात सर्व राज्यांना आधीच खबरदारीचा सल्ला पाठवला आहे, ज्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासनाच्या अल्प दृष्टीक्षेपामुळे पोल्ट्री उत्पादकांसह मका आणि सोयाबीन शेतकर्‍यांचीही स्थिती बिघडत आहे.

सोमवारी पत्रकार परिषदेत गिरीरीज सिंह म्हणाले की, राज्यांमध्ये जनजागृती नसल्यामुळे बर्‍याच ठिकाणी प्रचंड घबराट पसरली आहे. लोकं चिकन आणि अंडी खाणे टाळत आहेत. परिणामी, कोरोना आणि आता बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री उद्योगाची अवस्था बिकट झाली आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.

बर्ड फ्लू 10 राज्यात पसरला

हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये बर्ड फ्लू आढळला झाले. यातील सहा राज्यांनी राज्यात कुक्कुटपालन तसेच त्यांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. त्यापैकी हरियाणामधील तीन जिल्हे, हिमाचल प्रदेशातील पाच जिल्हे, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील सर्व जिल्ह्यांमध्ये अशी बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत बाहेरून कोंबड्या आणण्यास बंदी आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, 'अशा बंदीमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होते, पण परिस्थिती तशी नसते.'

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर पत्र लिहून खबरदारीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, 'केंद्र सरकार वेळोवेळी सूचना राज्यांना पाठवत आहे. पण लोकांनी याकडे लक्ष दिले नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैज्ञानिकांनी सल्ल्यानुसार सामान्य ग्राहकांच्या आरोग्याबरोबरच शेतकऱ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांचीही राज्यांनी विचार करावा.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 10 राज्यात बर्ड फ्लू पसरल्याची पुष्टी दिल्यानंतर सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या प्रदेशातील जलाशय, प्राणीसंग्रहालय आणि कुक्कुटपालनांचे निरीक्षण करावे याची दक्षता घ्यावी, यासाठी पंतप्रधानांनी प्रभावी राज्य सरकारांना विचारणा केली आहे. आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनांबाबत जिल्हा अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन त्यांनी जिल्हा सचिवांना केले आहे.