बिटकॉइनचा नवा उच्चांक, एकाच दिवसात 1,29,000 रूपयांनी वाढला भाव

 गेल्या 24 तासात (बुधवार) बिटकॉइनने 12,000 अमेरिकी डॉलरवरून चक्क 14,000 डॉलरवर झेप घेतली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 7, 2017, 07:06 PM IST
बिटकॉइनचा नवा उच्चांक, एकाच दिवसात 1,29,000 रूपयांनी वाढला भाव  title=

नवी दिल्ली : बिटकॉइनच्या व्यवहाराबाबत भलेही भारतीय रिझर्व्ह बॅंकेने धोक्याचा इशारा दिला आहे. पण, तरिसुद्धा लोक बिटकॉइनवर विश्वास ठेवताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर, बिटकॉइनही एका-दोन रात्रीत मोठी मजल मारताना दिसत आहे. बुधवारीही बिटकॉइनने अशीच कामगिरी दाखवली. गेल्या 24 तासात (बुधवार) बिटकॉइनने 12,000 अमेरिकी डॉलरवरून चक्क 14,000 डॉलरवर झेप घेतली.

अनेकजण झाले 'लख'पती

डिजिटल करन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिटकॉइनने अनेकांना लखपती केले आहे. गेल्या 24 तासात बिटकॉइनच्या माध्यमातून तब्बल 1,29,084 रूपयांची एकून कमाई वेगवेगळ्या मंडळींना झाली. या वर्षीच्या सुरूवातीला 1,000 डॉलरवर राहिलेल्या बिटकॉइनने गेल्या आठवड्यात 10,000 डॉलरची सीमा पार केली. दिग्गज अर्थशास्त्रज्ञ आणि बिजनेस लीडर्सकडून बिटकॉईनबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. तरीही लोकांचा उत्साह कायम आहे. लोक बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करत आहेत. गेल्या 24 तासात बिटकॉइनने पहिल्यांदा 12,000, त्यानंतर 13,000 आणि सर्वात शेवटी 14,000 डॉलरचा टप्पा पार केला. 

बिटकॉइनने घेतली भरारी

हॉंगकॉंगमध्येही गुरूवारी सुरवातीच्या व्यवहारात बिटकॉइनची किंमत 14000 डॉलरवर पोहोचली. यावर्षी या क्षेत्रात मोठा चढउतार पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यातच बिटकॉइन 11,000 डॉलरपर्यंत घसरला होता. मात्र, त्यानंतर बिटकॉइनने जोरदार भरारी घेतली. लोकांना 3,000 डॉलर पर्यंत मजल मारलॅचे पहायला मिळाले.

बिटकॉइन ही फ्रॉड करन्सी

दरम्यान, अमेरिकेतील सर्वात मोठे गुंतवणूकदार जे.पी. मॉर्गनचे सीईओ जेमी डिमॉन यांनी म्हटले आहे की, बिटकॉइन ही एक फ्रॉड करन्सी आहे. ही एक ड्रग्ज आणि विश्वासघात करणाऱ्या लोकांची करन्सी आहे, असेही डिमॉन यांनी म्हटले आहे.

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोकादायक ठरू शकते; आरबीआयचा इशारा

बिटकॉईन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे तर, काही त्या विचारात आहेत. पण, या व्हर्च्युअल करन्सीबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) इशारा दिला आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणे हे भविष्यासाठी धोकादायक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.  आरबीआयने म्हटले आहे की, 'गेल्या काही काळापासून व्हर्च्युअल करन्सीच्या मूल्यामध्ये अप्रत्यक्षरित्या वाढ आणि इनिशियल कॉईन ऑफरिंग (ICO) यांच्यात मोठी वृद्ध झाली आहे. ही वृद्धी पाहून आम्हाला चिंता वाटते. महत्त्वाचे असे की, बिटकॉईन हा रिझर्व्ह बँक निर्धारीत करत नाही.