नवी दिल्ली : बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput)निधनानंतर तीन प्रमुख एजेन्सी सीबीआय, ईडी आणि एनसीबी या प्रकरणात तपास करत आहे. यादरम्यान भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी, सुशांतची हत्या झाली असून यामागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी, सुशांत आत्महत्या प्रकरणात अंतिम निर्णय कधी येईल, असा सवाल सुशांतचे चाहते विचारत असल्याचं ट्विट केलं आहे. पार्थिव शरीर नसल्याने एम्सची टीम यावर स्वतंत्र्य चौकशी करु शकत नाही. त्यामुळे आता रुग्णालयातून देण्यात आलेल्या नोंदींवरच अवलंबून राहावं लागणार. हत्येची बाब नाकारली जाऊ शकत नाही. परंतु सीबीआय परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आपला निर्णय घेऊ शकते.
SSR bhaktas ask when SSR case will reach prosecution. I can’t say but: AIIMS team could'nt make independent probe since no body. So relied on Hospital records & said "murder not ruled out but CBI can decide on circumstantial evidence”. So CBI,ED,NCB at it with vigour...contd next
— Subramanian Swamy (@Swamy39) September 12, 2020
'सीबीआय, एनसीबी आणि ईडी या त्रिमूर्ती एजन्सींनी मोठ्या पुराव्यांचा खुलासा केला आहे. मला विश्वास आहे की, या पुराव्यांआधारे ही कट रचून झालेली हत्या असल्याचं, सीबीआयला कोर्टात सिद्ध करणं सोपं होईल' असंही ट्विट करत सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं आहे.
Now the Trimurti agencies have unearthed huge evidence by which I am confident CBI will find it easy to prove in Court that it was indeed murder by conspiracy. Not only justice will be done but SSR will be vindicated by the clean up that follows in Bollywood.
— Subramanian Swamy (@Swamy39) September 12, 2020
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या रिया चक्रवर्तीचा (Rhea chakraborty) जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. रियासह तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, जैद आणि बासित अशा सहा जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज आणून देण्यामध्ये आपली भूमिका असल्याची कबुली रियाने एनसीबीला दिली होती. तसंच ड्रग्जबाबतचं चॅटही आपलंच असल्याची माहितीही रियाने दिली होती.