भाजपचे संतोष गंगवार बनू शकतात हंगामी अध्यक्ष

भाजपचे संतोष गंगवार बनू शकतात हंगामी अध्यक्ष

Updated: Jun 11, 2019, 05:38 PM IST
भाजपचे संतोष गंगवार बनू शकतात हंगामी अध्यक्ष title=

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ खासदार संतोष गंगवार यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड होऊ शकते. नवीन खासदारांना नवीन प्रोटेम स्पीकर शपथ देणार आहेत. १७ व्या लोकसभेसाठी मतदारांनी आपले खासदार निवडले आहेत. आज पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यानंतर निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. यासाठी संतोष कुमार गंगवार यांना प्रोटेम स्पीकर बनवण्यात येऊ शकतं.

वरिष्ठ खासदाराला प्रोटेम स्पीकर बनवलं जातं. या वर्षी संतोष गंगवार यांना हा मान देण्यात आला आहे. संतोष गंगवार हे आठव्यांदा खासदार झाले आहेत. ते उत्तर प्रदेशातील बरेली लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी सपाच्या भगवत शरण गंगवार यांचा 1,67,282 मतांना पराभव केला.

1989 मध्ये पहिला विजय

1989 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून संतोष कुमार गंगवार यांनी पहिल्यांदा बरेली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर हा त्यांचा बालेकिल्ला झाला. 1989 ते 2004 पर्यंत लागोपाठ 6 वेळा ते येथून खासदार झाले. 

2009 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण 2014 मध्ये पुन्हा एकदा मोठ्या अंतराने त्यांनी विजय मिळवला आणि केंद्रात मंत्री झाले. 

2014 मध्ये कमलनाथ होते प्रोटेम स्पीकर

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार कमलनाथ हे प्रोटेम स्पीकर होते. कमलनाथ लोकसभेतील तेव्हा सर्वात वरिष्ठ खासदार होते. मध्य प्रदेशातील छिंदवाड़ा मतदारसंघातून त्यांनी ९ वेळा विजय मिळवला होता.

कोण असतात प्रोटेम स्पीकर

प्रोटेम (Pro-tem) शब्द लॅटिन भाषेतील आहे. प्रो टेम्‍पोर (Pro Tempore) असं त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काही काळासाठी. प्रोटेम स्‍पीकरची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ही नियुक्ती लोकसभा अध्यक्ष निवडेपर्यंत असते. प्रोटेम स्पीकर हे निवडून आलेल्या खासदारांना शपथ देतात. शपथविधीचा संपूर्ण कार्यक्रम हा यांच्याच देखरेखेखाली होते. खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षाची निवड होते. राष्ट्रपती लोकसभेतील कोणत्याही एका सदस्याला प्रोटेम स्‍पीकर म्हणून निवडतात.