भाजप खासदाराच्या मुलाला कार अपघातप्रकरणी अटक

भाजपच्या खासदार रुपा गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जी याला पोलिसांनी अटक केली आहे.  

ANI | Updated: Aug 16, 2019, 10:34 AM IST
भाजप खासदाराच्या मुलाला कार अपघातप्रकरणी अटक title=

कोलकाता : भाजपच्या राज्यसभा सदस्य रुपा गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जी याला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. कार अपघातानंतर पोलिसांनी आकाश मुखर्जीला अटक केली. आकाश नशेत गाडी चालवत होता, असा त्याच्यावर आरोप आहे. गुरुवारी रात्री आकाश याची कार कोलकाता येथील गोल्फ ग्रीन भागात एका भितींला जोरदार धडकली होती. २१ वर्षीय आकाशवर कलम ४७२, २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिकांनी सांगितल्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा आकाश मुखर्जी याच्या कारची रॉयल कलकत्ता गोल्फ क्लबच्या संरक्षक भिंतीशी धडक झाली. कार धडकताच भिंतीचा काही भाग कारवर पडला. या अपघातात आकाश मुखर्जी याला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि आकाश मुखर्जी याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर आकाशची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

अपघातानंतर गुरुवारी रात्री भाजप खासदार रूपा गांगुली यांनी ट्विट केले. "माझा मुलगा माझ्या राहत्याशेजारी अपघाताचा शिकार झाला आहे. मी पोलिसांना फोन केला. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करता यावी म्हणून. कोणीही राजकारण करू नये. मी माझ्या मुलावर प्रेम करते आणि त्याची काळजी घेण्यावर माझे लक्ष असते, परंतु कायद्याने त्याचे काम केले पाहिजे. "