भाजपाने राहुल गांधींच्या घरी पाठवली 1 किलो जिलेबी; Swiggy ला सांगितलं Cash on Delivery घ्या

हरियाणामधील (Haryana) अनपेक्षित विजयानंतर भाजपा समर्थकांनी (BJP Supporters) राहुल गांधींना (Rahul Gandhi) जिलेबीच्या (Jalebi) नावे ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 9, 2024, 04:43 PM IST
भाजपाने राहुल गांधींच्या घरी पाठवली 1 किलो जिलेबी; Swiggy ला सांगितलं Cash on Delivery घ्या title=

भाजपाला हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता आणली असून, इतिहास रचला आहे. भाजपाने सर्व अंदाज खोटे ठरवले असून काँग्रेसच्या विजयाच्या सर्व अपेक्षा फोल ठरवल्या आहेत. सर्व एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. यानंतर काँग्रेसच्या कार्यालयात सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. पण निकालात मात्र वेगळंच चित्र दिसलं. हरियाणात भाजपाने स्वबळावर निवडणूक लढल्याचा फायदा झाला आहे. भाजपाला 48 जागा मिळाल्या असून, काँग्रेसने 37 जागा जिंकल्या आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत आणि जिलेबी भरवत आधीच विजय साजरा करण्यास सुरुवात केली होती. पण जसजसा दिवस पुढे गेला तशी भाजपाने आघाडी घेतली. यानंतर सोशल मीडियावर 'जिलेबी' ट्रेंड होऊ लागली आणि भाजपाने काँग्रेसला डिवचण्यासाठी त्याचा वापर सुरु केला. 

भाजपच्या काही नेत्यांनी जिलेबी खातानाचे फोटो पोस्ट केले, तर काहींनी त्यांचा मोठा विजय साजरा करण्यासाठी गोड पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला. आसाम भाजपच्या एका सदस्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता हातात पाकीट घेऊन लखीमपूर येथील काँग्रेस कार्यालयात जाताना दिसत आहेत. 

यादरम्यान भाजपाने काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या दिल्लीमधील निवासस्थानी 1 किलो जिलेबी पाठवली आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील बिकानेरवाला येथून राहुल गांधीच्या अकबर रोडवरील घऱी ही जिलेबी पाठवण्यात आली आहे. स्क्रीनशॉटमध्ये जिलेबीची ऑर्डर दिल्याचं दिसत असून, यावेळी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडण्यात आला आहे. 

कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'हरियाणातील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राहुल गांधींच्या घऱी जिलेबी पाठवण्यात आली आहे'.

जिलेबी सोशल मीडियावर ट्रेंड का होत आहे?

हरियाणातील एका स्थानिक दुकानातील जिलेबीची जागतिक स्तरावर निर्यात केली जावी, असं सुचवणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी भाजप समर्थकांनी हा शब्द वापरला आहे. "मी कारमध्ये जिलेबी खाल्ली आणि माझी बहीण प्रियांकाला मेसेज केला की आज मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम जिलेबी खाल्ली आहे. मी तुमच्यासाठीही जिलेबीचा डबा घेऊन येत आहे," असं ते म्हणाले होते. स्वीट शॉपने जगभरात फॅक्टरी सुरु करायला हव्यात असंही ते म्हणाले होते. भाजपा नेत्यांनी यावेळी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. कारखान्यात गोडधोड बनत नाही अशा शब्दात त्यांनी ट्रोल केलं.