भाजपला उत्तर प्रदेशात जोरदार झटका, कैरानात सफाया

उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 31, 2018, 01:32 PM IST
भाजपला उत्तर प्रदेशात जोरदार झटका, कैरानात सफाया title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले होते.  कैरानामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, योगीनाही झटका बसला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते हुकूम सिंग यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक झाली. भाजपाने हुकूम सिंग यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात होत्या. तबस्सूम यांनी मृगांका यांचा पराभव करत मुख्यमंत्री योगींना जोरदार धक्का दिलाय.

राष्ट्रीय लोक दल (रालोद)च्या उमेदवार तबस्सूम हसन या ४१ हजार मतांनी विजयी झाल्यात. त्यांना काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीने जाहीर पाठिंबा दिला. १४ फेरीनंतरही तबस्सूम यांनी आघाडी घेतली होती. त्यांना विजयी म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

तबस्सूम यांना ५ लाख ४३ हजार ३९४ मते मिळालीत. त्यांनी २ लाख ८६ हजार ७०५ मतांची आघाडी घेतली. तर भाजपच्या उमेदवार मृगांका यांना २ लाख ४४ हजार ६२७ मते मिळालीत. विरोधकांनी योगी ससरकारला जोरदार धक्का दिलाय. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशमधून भाजपला हद्दपार करण्याचा निर्धार या विजयानंतर विरोधकांनी केलाय.