Black Magic : काळा मोती, कुंकू अन् मांसाचा तुकडा..! अंधारात घरासमोर अर्धनग्न अवस्थेत होते मांत्रिक, महिलेने दार उघडलं आणि...

घरासमोर तीन मांत्रिक अर्धनग्न अवस्थेत रात्रीच्या अंधारात काळी जादू करत असताना अचानक महिलेने दार उघडल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली. 

नेहा चौधरी | Updated: Oct 18, 2024, 01:34 PM IST
Black Magic : काळा मोती, कुंकू अन् मांसाचा तुकडा..! अंधारात घरासमोर अर्धनग्न अवस्थेत होते मांत्रिक, महिलेने दार उघडलं आणि... title=
Black Magic three half naked men practiced tantra puja in front of the house

सध्या ओटीटीवर रिलीज झालेली परभणीतील सत्य घटनेवर आधारीत 'मानवत मर्डर्स' (Manvat Murders) चर्चेत आहे. यात काळी जादूमुळे एकामागोमाग गावातील अकरा जणांची हत्या करण्यात आली. काहीसा असाच एक धक्कादायक अघोरी प्रकार समोर आलाय. मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलंय. गावातील एका घरासमोर तीन मांत्रिक रात्रीच्या अंधारात अर्धनग्न अवस्थेत तंत्रविद्या करताना दिसून आलीत. घरातील मंडळी झोपली असताना हे तीन मांत्रिक त्यांच्या दारासमोर अर्धनग्न अवस्थेत काळी जादू करत होती. पहाटे 4 वाजता घरातील महिला उठली आणि तिने दार उघडल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. (Black Magic three half naked men practiced tantra puja in front of the house)

तीन मांत्रिकांना अघोरी कृत्य करताना पाहून ती घाबरली आणि तिने घरातील लोकांना जाग केलं. घरातील मंडळी बाहेर येणारच त्या तांत्रिकांनी सर्व सामान्यासह तून पळ ठोकला. झालेला प्रकार शेजारी राहणाऱ्या लोकांनाही त्यांनी सांगितल्यावर त्या तीन मांत्रिकांची शोध मोहीम सुरु झाली. 

दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर तिन्ही तांत्रिक मोहनराम तलावाच्या काठावर बसलेले दिसून आलेत. लोकांना त्यांना जाब विचारल्यावर ते काहीही बोलण्यास तयार नव्हते. स्थानिकांनी त्यांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली तर ते नकार देत होते. त्यांच्याजवळ एक पिशवी होती, त्यात काय आहे असे लोक विचारल्यावर ते बिथरले. त्यांनी सुरुवातीला नकार दिला पण स्थानिकांचा संताप पाहून त्यांनी ती पिशवी खाली केली. 

काळा मोती, कुंकू अन् मांसाचा तुकडा..! 

पिशवीतून ज्या गोष्टी बाहेर येत होत्या त्या पाहून लोकं हैराण झाली आणि ती घाबरली. त्या पिशवीतून काळी जादू करण्याचे साहित्य बाहेर पडले. टिकली, काळा मोती, सिंदूर, मांसाचा तुकडा, नारळ आणि एवढंच नाही तर तीन जिवंत कोंबड्या त्यातील एक कोंबडी तर काळा रंगाची होती. स्थानिकांनी या तीन मांत्रिकांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. 

पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत असून ते ही काळी जादू का करत होती, याचा शोध घेत आहेत. दरम्यान महाराष्ट्रासह भारतात काळी जादू आणि मांत्रिकांवर बंदी असतानाही गावांमध्ये असे प्रकार आजही पाहिला मिळतात.