मुंबई : loksabha election 2019 कोलकाता येथे मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीदरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, ज्याचे थेट पडसाद दिल्लीपर्यंत पाहायला मिळत आहेत. देशात लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलेलं नसतानाही पश्चिम बंगालमध्ये सुरु असणारी हिंसा आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची भूमिका याविषयी आता सर्वच क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने 'दीदीगिरी नही चलेगी', असं म्हणत बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
लोकशाही धोक्यात आहे, विरोधी पक्षांनी एकत्र येत काम करण्याची गरज असल्याच्या बॅनर्जी वक्तव्याला अधोरेखित करत हा किती विरोधाभास आहे, हेच विवेकने त्याच्या ट्विटमधून दाखवून दिलं आहे. मला हेच कळत नाही आहे की, ममता दीदींनसारख्या आदणीय महिला सद्दाम हुसैनप्रमाणे का वागत आहेत? कारण, इथे तर त्यांच्या हुकूमशाहीमुळेच लोकशाही धोक्यात आहे', असं म्हणत विवेकने सध्याच्या संपूर्ण परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली.
I can’t understand why a respected lady like Didi is behaving like Saddam Hussain! Ironically, democracy is under threat and in danger by Dictator Didi herself. First #PriyankaSharma & now #TajinderBagga. यह दीदीगिरी नही चलेगी ! #SaveBengalSaveDemocracy #FreeTajinderBagga pic.twitter.com/oRq596aljH
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 15, 2019
प्रियंका शर्मा आणि तेजिंदर बग्गा यांना या साऱ्यामुळे झालेल्या अडचणीच्याही उल्लेख त्याने या ट्विटमध्ये केला. 'यह दीदीगीरी नहीं चलेगी।' असं म्हणत #SaveBengalSaveDemocracy #FreeTajinderBagga' हे हॅशटॅग त्याने ट्विटमध्ये जोडले. पश्चिम बंगालमध्ये भडकलेली ही हिंसा, देशात वाहणारे राजकीय वारे आणि सर्व घडामोडींना आलेला एकंदर वेग पाहता आता सर्वांच्याच नजरा २३ मे याच दिवसाकडे लागलेल्या आहेत. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणूकांच्या मतदानाचे निकाल या दिवशी जाहीर करण्यात येणार आहे, ज्यानंतर संपूर्ण राजकीय चित्रच स्पष्ट होणार आहे.