ऑनलाईन मुव्ही तिकीट ऑफर ; ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक

ऑफरअंतर्गत असं बुक करा मूव्ही तिकिट...

Updated: Dec 8, 2019, 02:32 PM IST
ऑनलाईन मुव्ही तिकीट ऑफर ; ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : चित्रपट पाहायला जायचा प्लान करत असाल तर एक ऑफर आहे. जर 'बुक माय शो'वर (BookMyShow) अॅमेझॉनवरुन तिकीट बुक केल्यास ५०० रुपयांपर्यंतचा (Assured cashback) कॅशबॅक मिळू शकतो. वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ऑफरअंतर्गत कमीत कमी ४५ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. 

या ऑफरवर कमीत कमी ४५ रुपयांच्या कॅशबॅकसाठी, कमीत कमी तिकीटाची बुकिंग व्हॅल्यू ३०० रुपये असणं आवश्यक आहे. ही ऑफर केवळ अॅमेझॉन पे (Amazon Pay) यूजर्ससाठी BookMyShow वर व्हॅलिड आहे. या ऑफरचा फायदा केवळ एकदाच घेता येऊ शकतो. 


फोटो सौजन्य : bookmyshow

पीव्हीआर सिनेमामध्ये फूड आणि बेवरेजवर ५० रुपयांची ऑफर मिळू शकते. त्यासाठी कमीत कमी २५० रुपयांची ऑर्डर असणं गरजेचं आहे. ही ऑफर BookMyShowच्या वेबसाइट आणि अॅपवर करण्यात आलेल्या बुकिंगवरही व्हॅलिड आहे. चेक आऊटच्या वेळी कूपन कोड PVR50 आणि जर मुव्ही तिकीट बुकिंगनंतर, फूड बुक केल्यास PVR50OFF या कूपन कोडचा वापर करायचा आहे.