तरूणीचा लग्नास नकार, संतापलेल्या तरूणानं उचललं मोठं पाऊलं

लग्नास नकार देणाऱ्या तरूणीसोबत तरूणाने जे केलं त्याने संपुर्ण गाव हादरलं, वाचा क्राईम स्टोरी 

Updated: Aug 30, 2022, 08:43 PM IST
 तरूणीचा लग्नास नकार, संतापलेल्या तरूणानं उचललं मोठं पाऊलं title=

खंडवा : झारखंडच्या दुमका येथील अंकिता हत्याकांडाने संपुर्ण देश हळहळला असताना आता आणखीण एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरूणाला पचलं नाही आहे. या संतापात त्याने जे केलं त्याने संपुर्ण गाव हादरलं आहे. नेमकं या तरूणाने या तरूणीसोबत काय केलंय ते जाणून घेऊयात.  

खांडवाच्या एका गावातील तरूणाने तरूणीला लग्नाची मागणी घातली होती. खरं तर या तरूणाने गेल्या अनेक दिवसांपासून तरूणीसमोर लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे तरूणी या सततच्या तगाद्याने वैतागली होती.मात्र तरूण तिला लग्नाची मागणी घालतंच होता. 

दरम्यान तरूणी सतत नकार देत असल्याने संतापलेल्या तरूणाने थेट तिचे घरचं गाठले होते.यावेळी त्याने पुन्हा तिला लग्नाची मागणी घातली होती.मात्र तरूणीने नकार दिल्याने संतापलेल्या तरूणीने सुरा गाढत तिचा गळाचं चिरला. इतक्यात तरूणीची बहिण घरी पोहोचली आणि बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पाडून जोरजोरात ओरडू लागली. बहीणीच्या ओरडण्याने ही घटना चव्हाट्यावर आली. 

तरूणीच्या आरडाओरडानंतर तरूणाने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना मध्यप्रदेशच्या खांडवा भागात घडली. या घटनेने संपुर्ण गाव हादरले.  

दरम्यान या घटनेनंतर तरूणीला जखमी अवस्थेत मुंडीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर आता मुलीला खांडव्याच्या शासकीय जिल्हा प्रमुख रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फरार झालेल्या आरोपीचे नाव बबलू आहे. या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.