Breaking news : दसऱ्यादिवशी भीषण अपघात, भरधाव कारनं 20 लोकांना चिरडलं

मिळालेल्या माहितीनुसार दुर्गा विसरजनासाठी भाविक जात असताना गांजाने भरलेल्या भरधाव कारने अनेक लोकांना चिरडलं

Updated: Oct 15, 2021, 05:50 PM IST
Breaking news : दसऱ्यादिवशी भीषण अपघात, भरधाव कारनं 20 लोकांना चिरडलं

छत्तीसगड: देशात दसऱ्याचा उत्साह आहे. आनंदात सर्वजण दसरा साजरा करत असताना एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने अनेक लोकांना चिरडलं आहे. काही दिवसांपूर्वी लखीमपूर इथे अशा प्रकारची घटना घडली होती. लखीमपूर दुर्घटनेची पुनरावृत्ती छत्तीसगडमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार दुर्गा विसर्जनासाठी लोक जात होते. यावेळी मोठ्या संख्येनं गावातील लोक उपस्थित होते. ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. एका भरधाव कारने अनेक लोकांना चिरडलं आहे. जशपूर इथे कार्यक्रम सुरू असताना लाल रंगाच्या भरधाव कारने अनेक लोकांना चिरडलं आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 20 लोकांना चिरडल्याची माहिती मिळाली आहे. काही लोक जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठं तणावपूर्ण वातावरण आहे. 

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रायगढ़ रोड इथे ही दुर्घटना घडली आहे.