मुंबई : सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तुमच्या मनाला स्पर्श करतात. मात्र काही व्हिडीओ तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतात. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लग्नातील वरमाला घालण्याच्या विधीचा आहे. एकमेकांना आनंदाने, प्रेमाने वरमाला घालायचं सोडून हे दोघं एकमेकांशी चक्क भांडत आहे.
अर्ध्या मिनिटाचा हा व्हि़डिओ आहे. नवरा आणि नवरी स्टेजवर उभे आहेत. एकमेकांना वरमाला घालायचं सोडून हे दुश्मनी काढत आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हाला कळणारच नाही की हे दोघे असं का वागत आहेत. या व्हिडीओत दोघंही एकमेकांना सरळ वरमाला घालत नाही. नवरदेवाची वरमाला घालताना ती टोपीवरच अडकते. तर नववधुची वरमाला तिच्या डोक्यावरच अडकते. दोघंही एकमेकांना प्रेमाने वरमाला घालत नाही. त्यानंतर यांच्यातील वाद विकोपाला जाऊ नये म्हणून उपस्थिती परिस्थिती सांभाळून घेतात.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ official_niranjanm87 या पेजवर शेअर केलाय. लग्न म्हणलं की मज्जा, मस्ती, थट्टा असे अनेक प्रकार घडत असतात. एवढंच नाही तर अशा अनेक प्रथा आहेत, ज्या लग्न कार्यात आपणा पाहातो. त्यापैकी एक प्रथा म्हणजे, जेव्हा नवरीची बहिण नवरदेवाचे बूट चोरते आणि त्या बदल्यात पैसे मागते. याचं उत्तम उदाहण आतापर्यंत आपल्याला चित्रपटांमध्ये पाहाता येत होते. पण आता सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे लग्नचं नाही तर अन्य कार्यक्रमांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. आता असा एक व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला जीजा-सालीचे भांडण पाहाता येणार आहे.