देवानगंज : लग्न म्हणजे प्रत्येक मुला मुलीच्या आयुष्यातील मोठा दिवस, लग्नानंतर नवरा आणि नवरी दोघांच्याही नव्या आयुष्याची सुरवात होते. परंतु बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात असे काही घडले की, मुलीने लग्न तर केलं. परंतु ती सासरी जायला तयार नव्हती. अनेकांनी अनेक विनंत्या केल्या, परंतु ती तिच्या जिद्दीवर अडून बसली. असे काय घडले असावे की, वधू तिच्या सासरी जायला तयार नव्हती?
मिळालेल्या माहितीनुसार, देवानगंजमध्ये असलेल्या काली मंदिरात रविवारी रात्री उशिरा मुला आणि मुलीचे लग्न घाईघाईने पार पडले.या लग्नात पंडितसह मुलाच्या बाजूचे 5 लोक लग्न करण्यासाठी यूपीहून आले होते. लग्न झाल्यानंतर 4 लोकं पुन्हा उत्तर प्रदेशात गेले आणि मुलगा देवानगंजमध्ये राहिला. परंतु मुलगी मात्र नवऱ्यासोबत सासरी जायला तयार नव्हती.
लग्न झालेली ही नववधू मोनी कुमारी अवघ्या 13 वर्षाची आहे. तर तिच्य़ा नवऱ्याचे नाव अनेकपाल सिंह आहे, जो 35 वर्षे आहे. हा नवरा उत्तर प्रदेशातील अहमदनगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. आपला देश हा इतका पुढारलेला असला तरी अद्यापही भारतातील अनेक असे भाग आहेत, जेथे बालविवाह होत आहे.
ही मुलगा लहान असली तरी ती हूशार आहे. तिने तिचे लग्न मान्य केले नाही. अशीच हूशारी आणि जिद्द जर प्रत्येक मुलीने दाखवली, तर भारतातील बालविवाहावर रोख लागू शकेल.
या प्रकरणाबद्दल मुलीला विचारले असता तिने सांगितले की, मी या लग्नाला विरोध करत आहे, कारण माझ्या वडिलांनी जबरदस्तीने माझे लग्न एका वयस्क मुलाबरोबर करुन दिले आहे. त्यामुळे मी यावर मुलीचे वडील गिरीश मंडळ म्हणाले की, मी खूप गरीब आहे. मी माझ्या मुलीशी लग्न करण्यास सक्षम नाही. यामुलाला आम्हाला जास्त हूंडा द्यावा लागणार नाही, त्यामुळे मी या मुलासोबत लग्न करुन देण्यास तयार झालो.