रॉकस्टार नवरी! गॉगल आणि बुलेट दोन्ही थाटात घेऊन नवरदेवाकडे पोहोचली, पाहा व्हिडीओ

नाद नाय करायचा! "पोराला न्यायला पोरगी दारात", नवरी बुलेटवरून पोहोचली, एकदा हा व्हीडिओ पाहाच......  

Updated: Aug 7, 2021, 10:13 PM IST
रॉकस्टार नवरी! गॉगल आणि बुलेट दोन्ही थाटात घेऊन नवरदेवाकडे पोहोचली, पाहा व्हिडीओ title=

मुंबई: आजकाल लग्न समारंभात वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा ट्रेन्ड आला आहे. लग्न मंडपात वरमाला घालताना अनेक मजेशीर गमती जमती होत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. आपल्याकडे साधारण नवरा घोड्यावरून किंवा गाडीतून वरात घेऊन नवरीच्या दारात येतो अशी परंपरा आहे. मात्र ही परंपरा बाजूला ठेवत चक्क एक नवरीनं अजबच गोष्ट केली आहे.

लग्नाची वरात घेऊन नवरी बुलेटवरून थेट नवरदेवाच्या दारात पोहोचली आहे. तिचा स्वॅग पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नासाठी ही नववधू सुंदर सजली आहे. गॉगल लावून ती बुलेटवरून थेट नवरदेवाला घ्यायला जाणार आहे. तिचा हा लूक आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Wedding Planning_witty Wedding (@witty_wedding)

इंस्टाग्रामवर रील म्हणून शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वधूने रॉकस्टारप्रमाणे बाईक चालवली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिला लेहेंगा घालून बाईक चालवताना कोणतीही अडचण आली नाही. या बाईक राईडचा आनंद घेत ती लग्नाच्या मंडपात पोहोचली होती. लग्नाच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वधूचे नाव दृष्टी सैनी आहे आणि तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन मंडपात पोहोचणार आहे.

नवरीचा स्वॅग पाहण्यासाठी आतापर्यंत  8 लाख 44 हजार लोकांनी तिच्या व्हिडीओवर क्लिक केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. नेहमीच वरात घेऊन नववधूच्या दारात येण्याच्या परंपरेत या तरुणीनं थोडासा बदल करत थेट होणाऱ्या नवऱ्यालाच लग्नाच्या मंडपात बाईकवर मागे बसवून नेण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला सोशल मीडियावर कमालीची पसंती मिळत आहे.