नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर त्यावर पाकिस्तानकडून हरकती सुरु झाल्या आहेत. भारताच्या हवाईदलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानाच घुसून दहशतवाद्यांची ठिकाणं उध्वस्त केली होती. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे अनेक महत्त्वाच्या दहशतवाद्यांसह जवळपास ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
ट्विटरवर भारतीय जवान अभिनंदन वर्धमानला परत आणण्याची मागणी होत आहे.
1.30 : पाकिस्तानने आता दावा केला आहे की बडगाममध्ये पडलेल्या चॉपरशी आमचा काहीही संबंध नाही.
1.20 : पठानकोट ते जम्मू नॅशनल हायवेचा चार्ज भारतीय जवानांनी घेतला. याआधी पंजाब पोलिसांकडे होता चार्ज.
1.00 : अमृतसर एयरपोर्टवरुन सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थानी पोहोचवण्यात आलं आहे.
12.50 : पाकिस्तानातील सर्व एअरपोर्ट बंद करण्यात आले आहेत. पाकिस्ताननेही सर्व विमानं रद्द केली आहेत.
12: 40 : भारतीय वायुदलाने सर्व लढाऊ विमानांना अलर्ट जारी केला आहे. २ मिनिटात उड्डान भरता येईल अशा प्रकारचा अलर्ट पयलटला जारी करण्यात आला आहे. असा प्रकारचे अलर्ट आतापर्यंत फक्त युद्धाच्या वेळी दिले जात होते.
12.30 : बॉर्डर जवळच्या सर्व रुग्णालयांमधील औषधांचा स्टॉक वाढवला. सर्व रुग्णालयांना अलर्टवर राहण्याचे आदेश
12.10 : जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर, पठानकोट, चंडीगड, देहरादून आणि धर्मशाला एअरपोर्टवरुन सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. सगळ्या एअरपोर्टवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
12.00 : भारताने पाकिस्तानचं F16 हे विमान पाडलं आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करुन परत जात असताना भारताने हे विमान पाडलं.
11:52 : पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्त्यांनी ट्विट करत दावा केला आहे की, पाकिस्तानी वायुदलाने भारताच्या दोन विमानांना लक्ष्य केलं आहे. ज्यामध्ये एक विमान पाडलं असून भारताच्या एका पायलटला अटक केली आहे.
11: 45 गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व अर्धसैनिक दलाच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफचे मुख्य अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.
11. 30 : भारत-पाकिस्तानातील वाढता तणाव पाहता जम्मू-काश्मीर, लेह, पठानकोट एअरपोर्टवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. येथून जाणाऱ्या सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत.
11.20 : पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीचं उल्लंघन केलं आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकच्या या विमानांनी घुसखोरी केली आहे. पण भारताने लगेच अॅक्शन घेतल्यानंतर ही विमानं माघारी परतली आहेत.
11.00 : गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सकाळी नॉर्थ ब्लॉकमध्ये एनएसए अजित डोवाल, गृह सचिव राजीव गाबा, रॉ चीफ, आयबी चीफ यांच्यासोबत बैठक घेतली.