200 रुपयांपेक्षाही स्वस्त PSU शेअर; 46 टक्क्यांपर्यंत देऊ शकतात परतावा

 सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर शेअर बाजारात काही पीएसयु स्टॉकचे वॅल्युएशन चांगले राहिले आहे.

Updated: Nov 15, 2021, 01:31 PM IST
200 रुपयांपेक्षाही स्वस्त PSU शेअर; 46 टक्क्यांपर्यंत देऊ शकतात परतावा title=

मुंबई : सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर शेअर बाजारात काही पीएसयु स्टॉकचे वॅल्युएशन चांगले राहिले आहे. यामध्ये पुढे चांगला रिटर्न मिळण्याची आशा दिसून येत आहे. अशातच कोल इंडिया ( Coal India) आणि ओएनजीसी (ONGC)च्या  शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. 

आयसीआयसीआय सेक्युरिटीजने कोल इंडियामध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे तर, दुसरीकडे मोतीलाल ओस्वालने ओएनजीसीमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

कोल इंडियाबाबत सविस्तर (Coal India)
ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सेक्युरिटीजने कोल इंडियासाठी 234 रुपयांच्या शेअरचे लक्ष दिले आहे. 15 नोव्हेंबरला कंपनीचा शेअर 160 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. या स्तरावरून गुंतवणूक केल्यास 46 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.   

सप्टेंबर तिमाही निकालांनंतर हा PSU स्टॉक मार्केट एक्सपर्टच्या रडारवर आला आहे. कंपनीच्या वॉल्युममध्ये मोठी ग्रोथ झाली आहे. 

ओएनजीसीबाबत सविस्तर (ONGC) 
सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर या शेअरवर ब्रोकरेज हाऊस पुन्हा बुलिश आहेत. मोतीलाल ओस्वालने ओएनजीसीसाठी 195 रुपयांचे टार्गेट दिले आहे. 15 नोव्हेंबरला शेअरचा भाव 158 च्या आसपास ट्रेड करीत होता.

तर सध्याच्या किंमतीवर 23 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला एक्सपर्ट्सने दिला आहे. (ONGC BUY call by ICICI Securities )