रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून बहिणीला दिलं शौचालय बांधून

भाऊ-बहिणीच्या पवित्र बंधनाचा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त भाऊ आपल्या बहिणीला आकर्षक अशा भेट वस्तू देतो. भेट देण्याची ही पंरपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण गोण्डामधील एका गावातील भावाने आपल्या बहिणीला रक्षाबंधनांच्या निमित्ताने शौचालय बांधून दिलं आहे.

Updated: Aug 6, 2017, 10:18 AM IST
रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून बहिणीला दिलं शौचालय बांधून title=

लखनऊ : भाऊ-बहिणीच्या पवित्र बंधनाचा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त भाऊ आपल्या बहिणीला आकर्षक अशा भेट वस्तू देतो. भेट देण्याची ही पंरपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण गोण्डामधील एका गावातील भावाने आपल्या बहिणीला रक्षाबंधनांच्या निमित्ताने शौचालय बांधून दिलं आहे.

भावाच्या या अदभूत अशा भेटीची माहिती जिल्हा प्रशानलाला मिळताच अनेक सरकारी अधिकारी तेथे पोहोचले. त्या मुलाला सन्मानित करुन स्वच्छतेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले.