बीएसएफची मोठी कारवाई; घुसखोरीचा डाव उधळला

सुरक्षा दलाकडून गोळीबार होता तेव्हा .... 

Updated: Oct 6, 2019, 09:37 AM IST
बीएसएफची मोठी कारवाई; घुसखोरीचा डाव उधळला  title=
बीएसएफची मोठी कारवाई; घुसखोरीचा डाव उधळला

श्रीनगर : जम्मू काश्मीर येथील नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या बारामुला सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

जवळपास ४ ते ५ घुसखोरांनी नियंत्रण रेषेपाशी नौगाव सेक्टरमधून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सीमा सुरक्षा बल अर्थात बीएसएफकडून गोळीबार करण्यास सुरुवात केल्यानंतर हे घुसखोर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळ काढण्यास यशस्वी ठरले. 

सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात असली तरीही, या परिसरात वातावरण तणावग्रस्त असल्याचं पाहाय.ला मिळत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीसुद्धा बारामुला भागात दहशतवाद्यांकडून खुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. तेव्हा सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 

दहशतवाद्यांकडून वारंवार केली जाणारा घुसखोरीचा प्रयत्न आणि त्यामुळे उरी, बारामुला परिसरात निर्माण होणारं तणावातं वातावरण पाहता येथे सैन्यदलांकडून कमालीची सतर्कता पाळण्यात येत आहे. शक्य त्या सर्व परींनी पाकव्याप्त काश्मीरमधून होणारी सशस्त्र घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांकडून करण्यात येत आहे.