BSF Recruitment 2021: 10वी -12 वी पास उमेदवारांसाठी बीएसएफमध्ये नोकरीची संधी

सीमा सुरक्षा दलातर्फे भरतीद्वारा उमेदवारांची निवड लेखी आणि शारीरिक परीक्षांच्या आधारावर होणार आहे.

Updated: Jul 15, 2021, 01:15 PM IST
BSF Recruitment 2021: 10वी -12 वी पास उमेदवारांसाठी बीएसएफमध्ये नोकरीची संधी  title=

BSF Recruitment 2021 : सीमा सुरक्षा दलातर्फे भरतीद्वारा उमेदवारांची निवड लेखी आणि शारीरिक परीक्षांच्या आधारावर होणार आहे.

सीमा सुरक्षा दलातर्फे तरुणांसाठी नोकरीची  संधी उपलब्ध झाली आहे. BSFच्या एअरविंग, पॅरामेडिकल स्टाफ, आणि वेटरीनरी स्टाफच्या 285 पदांसाठी भरती होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे. (BSF Recruitment 2021 | Sena Bharti 2021 )

BSF Vacancy 2021 Details सविस्तर पदांची माहिती

एअरविंग
असिस्टंट एअरक्राफ्ट मॅकेनिक  (ASI) 49 जागा
असिस्टंट रेडिओ मॅकेनिक - 8 जागा
कॉन्स्टेबल - 8 जागा

पॅरामेडिकल स्टाफ
स्टाफ नर्स -77 जागा
ऑपरेशन थिएटर टेक्निशियन 2 जागा
लॅब टेक्निशियन 56 जागा
सीटी 18 जागा

वेटरीनरी स्टाफ
एचसी (पशु चिकित्सा) 40 जागा
कॉन्स्टेबल(कॅनलमॅन) 30 जागा

पगार

असिस्टंट एअरक्राफ्ट मॅकेनिक

असिस्टंट एअरक्राफ्ट मॅकेनिक - पे मॅट्रिक्स लेवल 5 च्या अनुसार 7 व्या वेतन आयोगानुसार 29200 रुपयांपासून ते 92300 रुपये प्रति महिना

असिस्टंट रेडिओ मॅकेनिक

- पे मॅट्रिक्स लेवल 5 च्या अनुसार 7 व्या वेतन आयोगानुसार 29200 रुपयांपासून ते 92300 रुपये प्रति महिना

कॉन्स्टेबल
पे मॅट्रिक्स लेवल 3 च्या अनुसार 7 व्या वेतन आयोगानुसार 21700 रुपये - 69100 रुपये प्रति महिनापर्यंत

स्टाफ नर्स 
ग्रेड पे लेवल 6 नुसार 35400 - 112400 रुपये प्रति महिना

ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
पे मॅट्रिक्स लेवल 5  अनुसार 7 व्या वेतन आयोगानुसार 29200 - 92300 रुपये प्रति महिना

लॅब टेक्निशियन
पे मॅट्रिक्स लेवल 5  अनुसार 7 व्या वेतन आयोगानुसार 29200 - 92300 रुपये प्रति महिना

योग्यता आणि वयोमर्यादा

एअरविंग पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी संबधीत ट्रेडमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा किंना एअरफोर्स गृप X चे सर्टफिकिट असायला हवे. या पदासाठी अर्ज 28 वर्षापर्यंतचे उमेदवार करू शकतात.

पॅरामेडिकल स्टाफ आणि वेटेरिनरी स्टाफच्या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी तसेच संबधीत ट्रेडमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री असणे अनिवार्य आहे. 28 वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकता.

कॉन्स्टेबल पदांसाठी  10 व पास असणे तसेच कोणत्याही सरकारी संस्थेत दोन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. 20 ते 25 वर्षाचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतील. 

बीएसएफद्वारा होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक परीक्षा आणि मेडिकल टेस्टच्या आधारे होणार आहे.

अधिक माहितीसाठी https://rectt.bsf.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या