Union Budget 2023: बजेटआधी पंतप्रधान मोदी समजून घेणार 'अर्थ', तज्ज्ञांसोबत 13 जानेवारीला बैठक

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Budget 2023) बजेटपूर्वी शुक्रवारी 13 जानेवारीला नीती आयोगातील (NITI Aayog) विविध क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ तसंच तज्ज्ञांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jan 9, 2023, 08:20 PM IST
Union Budget 2023: बजेटआधी पंतप्रधान मोदी समजून घेणार 'अर्थ', तज्ज्ञांसोबत 13 जानेवारीला बैठक title=

Budget 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Budget 2023) बजेटपूर्वी शुक्रवारी 13 जानेवारीला नीती आयोगातील (NITI Aayog) विविध क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ तसंच तज्ज्ञांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी अर्थव्यवस्थेची स्थिती आणि जीडीपी दर यांच्यावर चर्चा करणार आहेत. 

चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या बैठकीला अनेक केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

1 फेब्रुवारी 2023 रोजी येणार अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत 2023-24 या यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुख्य म्हणजे देशाचा आर्थिक विकास दर वार्षिक आधारावर सात टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, आणि असे झाल्यास भारताने सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेचा दर्जा गमावू शकतो.

सांख्यिकी मंत्रालयाच्या (Ministry of Statistics) पहिल्या अधिकृत अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये GDP वाढीचा दर 7 टक्के असेल, जो गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 8.7 टक्के इतका होता.

भारताच्या GDP चा अंदाज

हा अंदाज सरकारच्या (India's GDP estimation) आधीच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाजापेक्षा 6.8 टक्के जास्त आहे. हा अंदाज अचूक ठरला तर भारताचा आर्थिक विकास हा दर सौदी अरेबियाच्या तुलनेत कमी असणार आहे. सौदी अरेबियाचा विकास दर हा 7.6 टक्के असल्याचा अंदाज आहे. 

भारताचा GDP वाढीचा दर जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 6.3 टक्के इतका होता. या काळात सौदी अरेबियाची अर्थव्यवस्थेत 8.7 टक्के दराने वाढ झाली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x