जे कोणत्याही आईला जमलं नाही ते बैलानं करून दाखवलं, फोनच्या दुकानाची भीषण अवस्था दाखवणारा पाहा व्हिडीओ

मोबाईल खरेदीसाठी दुकानात घुसला आणि नासधूस करून बाहेर पडला! पाहा व्हिडीओ

Updated: Sep 27, 2021, 08:17 PM IST
जे कोणत्याही आईला जमलं नाही ते बैलानं करून दाखवलं, फोनच्या दुकानाची भीषण अवस्था दाखवणारा पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली: लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण मोबाईलमध्ये रात्रंदिवस डोकं घुपसून बसलेले असतात. लहान मुलं आणि विद्यार्थी देखील आता मोबाईलवर ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्तानं जास्त वेळ फोनवर घालवत आहेत. मोबाईलचा अति वापर टाळा हे पालक ओरडून समजवून थकले मात्र मुलांच्या काही ते पचनी पडत नाही. मोबाईल उचलून फेकून द्यावा अशी प्रत्येक आईची सुप्त इच्छा असते. इतकच नाही तर मोबाईल गायब व्हावा असंही तिला वाटत असतं पण जे या आईला जमलं नाही ते या बैलानं केल्याचं दिसत आहे. 

एका बैलाची जबरदस्त सटकली आणि तो चक्क मोबाईल खरेदीसाठी दुकानात घुसला.  सोशल मीडियावर सध्या या बैलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक बैल रागाच्या भरात आला आणि थेट मोबाईलच्या दुकानात घुसला. बैल जोरात धावत येताना बघून काऊँटरवर बसलेला कर्मचारी उठून पळून गेला.

बैलाला दुकानात शिरल्यानंतर भयंकर राग आला होता. राग अनावर न झाल्याने त्यानं आपल्या शिंगानी अख्खा डेस्क गदागदा हलवलं. त्यानंतर यू टर्न घेत बैलानं समोरच्या बाजूला मोर्चा वळवला.समोरच्या बाजूला बसलेले कर्मचारीही वेळीच उठले म्हणून वाचले. बैलानं काऊंटरवर ठेवलेले फोन पाहिले आणि मग दुकानाची नासधूस करुन हा बैल अखेर बाहेर पडला. या बैलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

काही दिवसांपूर्वी एक माकड दारूच्या दुकानात धुमशान घालताना दिसलं. त्याला दारूची चटक लागली आणि हा प्रकार घडला. पण चक्क आता बैल मोबाईलच्या दुकानात घुसला. या दुकानात घुसून त्याने सगळ्या वस्तू पाहिल्या. हा बैल मोबाईल खरेदी करायला गेला असावा आणि त्याला फोन आवडला नाही म्हणून वैतागलेला असावा अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली.