मैत्री पडली सिंहिणींवर भारी! 8 जणांच्या तावडीतून असा वाचवला म्हशीनं जीव पाहा व्हिडीओ

मैत्री असावी तर अशी! 8 सिहिंणींच्या तावडीतून म्हशीला कसं वाचवले? पाहा थरारक व्हिडीओ

Updated: Sep 27, 2021, 08:51 PM IST
मैत्री पडली सिंहिणींवर भारी!  8 जणांच्या तावडीतून असा वाचवला म्हशीनं जीव पाहा व्हिडीओ

मुंबई: मित्र हा शब्दच किती सुंदर आहे. जीवाला जीव देणारा हक्काचा मित्र असेल तर जगातील सर्व दु:ख समस्या संकट सगळी पळवून लावण्याची ताकद या मैत्रीमध्ये असते. फक्त माणसांचीच नाही तर प्राण्यांची अशी मैत्री असते. अनेकदा याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियाच्या जगात खरी मैत्री कधीतरी लोप पावताना दिसत आहे. माणसांमध्ये तर आता प्रत्येकजण मित्रातही स्वार्थ शोधत आहेत. 

सोशल मीडियावर म्हशीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सच्चा मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं आहे. 8 सिहिणींनी हल्ला केल्यानंतर म्हशीने आपला जीव वाचवण्यासाठी खूप धडपड केली. मात्र 8 सिहिणींनी त्या म्हशीला घेरलंच आणि तिला मारण्यासाठी पूर्ण योजना केली. मात्र म्हशीचे इतर साथीदार त्याच्या मदतीला वेळीच धावून आले. त्यांनी सिहिणींचा प्लॅन उधळून लावला. 

म्हशीच्या मित्रांनी सिहिणींना पळताभुई थोडी केली आणि आपल्या इतर म्हशींनी जीव वाचवला. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकांनीही भरभरून कमेंट्स केल्या आहेत. मित्र असावा तर असा! मित्राशिवाय जग अपूर्ण आहे. या जगात सर्वात भारी मित्र आहे असे युझर्सनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे. 

आतापर्यंत हा व्हिडीओ 45 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 683 हून अधिक लोकांनी या व्हिडीओला रिट्वीट केलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. काही युझर्स तर यांच्याकडून माणसांनी मैत्रीचं नातं कसं जपायचं यावरही चर्चा करत असल्याचं दिसत आहे.