आगर-मालवा : आगर-मालवा जिल्ह्यातून एक अजब-गजब प्रकार घडला आहे. इथे आपल्या मालकावर चोरीचा आरोप लागल्यानंतर म्हशीने आपल्या मालकाला वाचवलं आहे. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की, पंचांना देखील ते सोडवणे कठीण झाले होते परंतु म्हशीने हे प्रकरण झटक्यात सोडवलं. खरेतर सामगी गावातून एक म्हैस चोरीला गेली. होती यानंतर मालकाने दुसर्याच एका म्हशीवर आपला हक्क सांगितला. कारण ती म्हैस हूबेहूब त्याच्या चोरीला गेलेल्या म्हैस सारखी दिसत होती. ही म्हैस आपल्या मालकाशी प्रामाणिक असल्याने ती आपल्या मालकाकडे गेली ज्यामुळे हे प्रकरण सुटलं आहे.
ही अनोखी घटना आगर मालवा जिल्ह्यातील कानड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या सामगी गावची आहे. गावच्या गोपाल गोस्वामी यांची 7 जून रोजी म्हैस चोरीला गेली. त्यानंतर शनिवारी माकड़ौन पोलिस ठाण्यातून चोरीला गेलेली म्हैस मिळाली असल्याचे गोपाल यांना कळवण्यात आले. त्यानंतर गोपाल लगेचच त्या पोलिस ठाण्यात गेले परंतु पोलिस ठाण्यात त्याची म्हैस सापडली नाही.
त्यानंतर माकड़ौन येथील रहिवासी कमल जाट यांच्याकडे गोपाल यांनी एक म्हैस पाहिली जी त्यांची म्हैस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून ते माकड़ौन येथे पोहोचले आणि कमल जट यांची म्हैस ते स्वत:चीच असल्याचे सांगू लागले. त्यावर कमल जाट यांनी सांगितले की, मी ही म्हैस राजेंद्रसिंग निवासी ठाणे माकड़ौन येथून खरेदी केली आहे. परंतु गोपाल हे मान्य करण्यास तयार नव्हते. ते ती म्हैस आपलीच असल्याचे सांगू लागले.
त्यानंतर हे प्रकरण गावच्या पंचांपर्यंत पोहोचले. त्यानंतर कमल जाट यांच्या घरातून त्या म्हशीला गाडीतून कानड़जवळील समगी ग्रामपंचायतेत आणले गेले. त्यानंतर गोपालच्या शेतात या म्हशीला सोडण्यात आले, तेव्हा त्या म्हशीने गोपालच्या घरी जाण्याऐवजी, आपला मार्ग बदलला आणि आपल्या खऱ्या मालकाकडे म्हणजे कमलकडे गेली. ज्यामुळे या मोठ्या प्रकरणाचा लगेच निकाल लागला.
त्यानंतर गोपाल यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या म्हशीला मोठ्या काळजीने सांभाळले आहे. तिला श्रीदेवी असे नाव दिले आहे. कमलकडे असणारी ही म्हैस अगदी त्यांच्या श्रीदेवी सारखीच दिसत आहे. ज्यामुळे त्यांना ही म्हैस त्यांचीच असल्याचे वाटले.
परंतु ही म्हैस आपल्या खऱ्या मालकाकडे गेल्यामुळे सगळे प्रश्न सुटले आणि तिचा खरा मालक समोर आला. या प्रकरणात कमल जत म्हणाले की, "त्यांची म्हैस ही तशी नवीन होती. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच तिला विकत घेतले होते, परंतु तरीही ती माझ्याजवळ आली ज्यामुळे माझ्यावरचा चोरीचा आरोप टळला."