'या' राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

 बुलबुल वादळाची शक्यता...

Updated: Nov 9, 2019, 04:58 PM IST
'या' राज्यात मुसळधार पावसाची शक्यता title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : हवामान खात्याने (IMD)दिलेल्या माहितीनुसार, भारतातील काही भागात बुलबुल वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्रिपुरा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पदुच्चेरी येथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक आणि केरळमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारी भागात बुलबुल वादळामुळे वाऱ्याचा वेग १४५ ते १५५ किलोमीटर ताशी इतका असण्याची शक्यता आहे. 

  

समुद्रातील हालचाली लक्षात घेता, हवामान खात्याकडून मच्छीमारांना इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.