चिडलेल्या वळूनं महागड्या SUV गाडीलाच घेतलं शिंगावर... पुढे काय झालं पाहा व्हिडीओ

वाटेत आली म्हणून गाडीला शिंगावर घेतलं, ड्रायव्हरला फुटला घाम पाहा नेमकं काय घडलं

Updated: Aug 2, 2021, 11:04 PM IST
चिडलेल्या वळूनं महागड्या SUV गाडीलाच घेतलं शिंगावर... पुढे काय झालं पाहा व्हिडीओ

मुंबई: आतापर्यंत तुम्ही एखाद्या सिनेमातील सीन पाहिला असेल चिडलेला वळू सगळं उद्ध्वस्त करत सुटतो. अनेकदा वळू रस्त्यावर नासधूस करताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर चिडलेल्या वळूचा एक व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. याने कोणत्याही भाजी किंवा दुकानाची नाही तर चक्क एका गाडीची तोडफोड करण्याचा चंग बाधला आहे. वाटेत दिसली म्हणून तिला शिंगावर घेऊन त्याची तोडफोड करत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चिडलेला काळ्या रंगाचा वळू हा खूपचं रागात आहे. तो रस्त्यावरून सैरावैरा पळत आहे. त्याच्या भीतीनं लोकं एका बाजूला उभी आहेत. तर रस्त्याच्या कडेला एक महागडी एसयूव्ही गाडीही उभी आहे. ज्यामध्ये एक ड्रायव्हरही दिसत आहे.

चिडलेला वळू हा कोणालाही दुखापत न करता थेट या काळ्या रंगाच्या महागड्या एसयूव्ही कारकडे येतो आणि आपल्या शिंगाने त्या गाडीला उचलण्याचा प्रयत्न करतो. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काहींच्या अंगावर काटाही आला आहे. हा वळू ही महागडी कार आपल्या शिंगावर उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@vipcars_06)

वळूच्या या व्हिडीओला आतापर्यंत 13 लाख 9 हजार 050 लोकांनी पाहिलं आहे. तर अनेक लोकांनी या वळूला उसकवल्याने त्याने हे कृत्य केल्याचा दावा करत आहेत. काही युझर्सनी भल्लाल देवला बोलवा तो या वळूला शांत करेल असंही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे.