मुंबई : पीएम मोदीचं स्वप्न असलेली बुलेट ट्रेनचं काम सुरु झालं आहे. मुंबई आणि अहमदाबादमध्ये ही ट्रेन धावणार आहे.
भारत आणि जपानच्या विशेषज्ञांनी सर्वेक्षण सुरू केलं आहे. मुंबई-अहमदाबाद रेल्वे कोरीडॉरचा 7 किलोमीटर लांब समुद्राच्या खालील माती आणि खडकांचे परीक्षण केले जात आहे
पीएम मोदींनी निवडणुकीत बुलेट ट्रेनचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी जपानशी करार केला. प्रकल्प पूर्ण झाल्यावर अहमदाबाद ते मुंबई प्रवास खूपच कमी कालावधीत पूर्ण होईल. सध्या सहा-सात तास लागतात.
नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी समुद्राखाली काम येत्या ५ वर्षात पूर्ण केलं जाईल असं म्हटलं आहे. खरे म्हणाले की, मिशन अंतर्गत समुद्रा खाली भुयार तयार करण्याचं काम 15 ऑगस्ट, 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या आम्ही जपानच्या संशोधकांसोबत समुद्र अभ्यास करत आहोत.
दोन प्रमुख महानगरांना जोडणारा हा हाय स्पीड ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाण्याजवळ देशात पहिल्या समुद्रा खालून प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे. ट्रेनचा जास्तीत जास्त वेग 350 किमी. प्रती तास असेल. बुलेट ट्रेन साबरमतीवरुन मुंबईला येईल. यासाठी दोन रेल्वे मार्ग असतील.