११ लोकांचा गूढ मृत्यू : मोक्षप्राप्तीसाठी भाटिया परिवार इंटरनेटवर सर्च करत असे 'हा' व्हिडिओ

चार दिवसांपूर्वी दिल्लीतील बुराडी परिसरातील एका घरात ११ जणांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. 

Updated: Jul 4, 2018, 12:06 PM IST
११ लोकांचा गूढ मृत्यू : मोक्षप्राप्तीसाठी भाटिया परिवार इंटरनेटवर सर्च करत असे 'हा' व्हिडिओ title=

नवी दिल्ली : चार दिवसांपूर्वी दिल्लीतील बुराडी परिसरातील एका घरात ११ जणांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या प्रकरणाबाबत नवनवे खुलासे होत आहेत. पोलीसांनी भाटिया परिवाराच्या घराची तपासणी केली आहे. त्याचबरोबर कंम्प्युटरवर हिस्ट्री देखील तपासण्यात आली आहे. यातून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ११ मृत्यूंची स्क्रिप्ट लिहिणारा घरातील मुलगा ललित भाटियासह संपूर्ण भाटिया परिवार मोक्षप्राप्तीसाठी इंटरनेटवर व्हिडिओज पाहत असतं.

२०१३ पासून धार्मिक कार्यात 

त्यानंतर घटनेच्या तीन दिवसानंतर राजस्थानातील चित्तोडगड येथे राहणारा तिसरा भाऊ दिनेश समोर आला आहे. या गूढ हत्याकांडामागे कोणतेही मंत्रतंत्र किंवा धार्मिक, तांत्रिक बाब नसल्याचे त्याने सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीच्या क्राईम ब्रॉंचने असा दावा केला आहे की, हे कुटुंब यू-ट्यूबवर मोक्षप्राप्ती, स्वर्ग, निर्वाणसंबंधित व्हिडिओज पाहत असे. हे संपूर्ण परिवार २०१३ पासून धार्मिक कार्यांमध्ये व्यस्त होते. मात्र याची कोणतीही माहिती नातेवाईक आणि शेजारच्यांना नव्हती.

व्हिडिओत सांगितले होते की...

इंटरनेटच्या सर्च हिस्ट्रीमध्ये एका बाबाचे व्हिडिओज खूप वेळा पाहिले गेले असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. या व्हिडिओत बाबा म्हणतात की, जर तुम्ही मृत्यूच्या वेळी आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून मनाला शांत ठेवा. त्याचदरम्यान ओमचा जप करत प्राण त्याग करा. असे केल्यास मोक्षप्राप्ती निश्चित आहे. या व्हिडिओत सांगितलेल्या काही गोष्टी घरातील रजिस्टरमध्ये लिहिलेल्या आढळल्या.

होणार या गोष्टींचा उलघडा

दिल्ली पोलिस सध्या ललितच्या आयुष्याचा उलघडा करण्यासाठी शोध घेत आहेत. त्यानंतर ही माहिती समोर येईल...

ललितचे मित्र कोण आहेत?
ललितचे लाईफस्टाईल काय होते?
ललित कोणाच्या जवळचा होता?
ललित आपल्या कुटुंबियांशी वागणूक कशी होती?
ललित वडीलांचा सर्वात लाडका मुलगा होता का?
केव्हापासून त्याच्या मनात असे विचार येऊ लागले किंवा वडीलांचा भास कधी पासून होऊ लागला?
ललितचा आवाज कसा गेला? याचीही शोध घेतला जाईल.