Multibagger Stock | 20 रुपयांच्या शेअरने केलं मालामाल; 1 लाखाचे झाले 8 लाख रुपये

जर तुम्ही शेअर बाजारात बंपर कमाई करण्याचा विचार करीत असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे

Updated: Oct 27, 2021, 01:39 PM IST
Multibagger Stock | 20 रुपयांच्या शेअरने केलं मालामाल; 1 लाखाचे झाले 8 लाख रुपये

मुंबई : जर तुम्ही शेअर बाजारात बंपर कमाई करण्याचा विचार करीत असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला एका मल्टीबॅगर शेअर बाबत सांगणार आहोत. ज्या शेअरने गुंतवणूकदारांना फक्त एका वर्षात 775 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. या पुढेही हा शेअर चांगले रिटर्न देण्याच्या तयारीत आहे. 

शेअर बाजारात तेजी 
शेअर बाजारात सध्या विक्रीचे वातावरण दिसून येत आहे. अशातच तुम्हाला खालच्या स्तरावरून शेअर्समध्ये खरेदी करून नफा कमावण्याची संधी आहे. हा शेअर म्हणजेच अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स (Arihant Superstructures)होय. या शेअरने गुंतवणूकदारांना 200 किंवा 300 नव्हे तर तब्बल 775 टक्के रिटर्न दिला आहे.

स्टॉकची किंमत 20 रुपये
ऑक्टोबर 2020 मध्ये शेअरची किंमत 20 रुपये होती. हा एक रिअल्टी फर्म स्टॉक आहे. आज या शेअरची किंमत 175 च्या आसपास आहे, 

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर, आज 7 लाख 75 हजार रुपये झाले असते.