New Wage Code | 30 मिनिटांपर्यंतचे जास्त काम 'ओवरटाईम' म्हणून ग्राह्य; 1 ऑक्टोबरपासून देशात बदलणार नियम

नविन ड्राफ्ट केलेल्या कायद्यानुसार 15 ते 30 मिनिटांच्या वेळेला 30 मिनिट ओवरटाईम समजले जाईल. 

Updated: Aug 23, 2021, 11:47 AM IST
New Wage Code | 30 मिनिटांपर्यंतचे जास्त काम 'ओवरटाईम' म्हणून ग्राह्य; 1 ऑक्टोबरपासून देशात बदलणार नियम

नवी दिल्ली : सरकार 1 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात वेतन कायदे लागू करणार आहे. सरकार या कायद्यांचे नियम जास्त फाइन ट्यून करण्याच्या प्रयत्नात आहे. हे कायदे 1 एप्रिल पासून लागू कऱण्यात येणार होते. 

1 ऑक्टोबरपासून सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल
1 ऑक्टोबरपासून नोकरी करणाऱ्या लोकांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांची Take Home Salary कमी होऊ शकते.

याशिवाय कामाचे तास, ओवरटाईम, ब्रेक टाईम सारख्या गोष्टींबाबत वेतन कायद्यात नियमावली करण्यात आली आहे. 

New Wage code काय आहे.
सरकारने 29 वेतन कायद्यांनी मिळून 4 नवीन वेतन कोड तयार केले आहेत. संसदेने ऑगस्ट 2019 मध्ये इंडस्ट्रियल रिलेशन, कामाची सुविधा, हेल्थ आणि वर्किंग कंडिशन आणि सोशल सेक्युरिटीच्या नियमांमध्ये बदल केले होते. 

हे चार कोड आहेत
1 कोड ऑन वेज
2 इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड
3 ऑक्युपेशनल सेफ्टी ऍंड हेल्थ 
4 सोशल सेक्युरिटी कोड

एकाचवेळी लागू होणार चारही कोड
सरकारी सूत्रांच्या मते सर्व कोड एकाचवेळी लागू करण्यात येणार आहे. वेज कोड ऍक्ट2019 च्या मते कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी कंपनीच्या CTC  पेक्षा कमी असू शकणार नाही.  तसेच सध्या अनेक कंपन्या बेसिक सॅलरी कमी करून अतिरिक्त भत्ते देतात. त्यामुळे कंपनीवर कमी आर्थिक ओझे पडते.

30 मिनिट जास्त काम केल्यास ओवरटाईम
नवीन कायद्यानुसार 15 ते 30 मिनिटांच्या दरम्यान, अतिरिक्त कामगाजाला देखील 30 मिनिट मोजून ओवरटाईममध्ये सामिल करण्यात येईल. सध्या 30 मिनिटाहून कमीची वेळ ओवरटाईम ग्राह्य धरली जात नाही. ड्राफ्ट नुसार कर्मचाऱ्याला सलग 5 तासाहून अधिक वेळ काम दिले जाणार नाही. दर 5 मिनिटानंतर 30 मिनिटांचा ब्रेक देणे अनिवार्य असेल.