Akshay Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्व असते. परंतु तुमच्या परिसरातील सराफा बाजार लॉकडाऊनमुळे बंद असण्याची शक्यता असेल. त्यामुळे नाराज होऊ नका. घरबसल्या शुद्ध 24 कॅरेट सोने तुम्ही खरेदी करू शकता. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक ज्वेलर्स ऑफर्स सुद्धा देत आहेत. आम्ही तुम्हाला घरबसल्या सोने खरेदी कसे करायचे ते सांगतोय.
जर तुम्ही GooglePay, Paytm किंवा HDFC बँक सेक्युरटीज, मोतीलाल ओसवालचे ग्राहक असाल तर डिजिटली तुम्ही फक्त 1 रुपयात शुद्ध प्रमाणित सोने खरेदी करू शकता. या सर्व प्लॅटफॉर्मने MMTP - PAMP सह करार केला आहे. MMTP-PAMP सोने शुद्धीकरण आणि मिटिंग कंपनी आहेत. जेव्हा तुम्ही पेटीम, गुगलपे किंवा कोणत्याही कंपनीकडून सोने खरेदी करता त्यावेळी ते MMTC-PAMP च्या सेफ्टी वॉल्ट्समध्ये सुरक्षित ठेवले जाते. हे सोने 99.9 टक्के शुद्ध असते.
तुम्ही MMTC-PAMP वरून डिजिटल सोन्याची फिजिकल डिलिवरी घेऊ शकता. याबाबतचे सर्व व्यवहार डिजिटल होतात. ग्राहक या प्लॅटफॉर्मवर सोने खरेदी करू शकतात. तसेच खरेदी केलेले सोने तिथेच विकू देखील शकतात.
अपस्टॉक्स गोल्ड प्लॅटफॉर्मवरून तुम्ही 24 कॅरेट सोने डिजिटल पद्धतीने खरेदी करू शकता. येथे सोन्याची किंमत रिअल टाईम आधारावर अपडेट होत असते. अपस्टॉक्स लवकरच डिजिटल गोल्ड सुविधा फिजिकल कॉईनमध्ये बदलण्याची सुविधा सुरू करणार आहे.