केंद्रीय मंत्रिमंडळाचा अल्पावधीतच विस्तार; इन-आऊट बद्धल उत्सुकता

होणार होणार म्हणून गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चिन्हे आहेत. येत्या ३ सप्टेंबरला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा नेमका विस्तारच असेल की त्यात खांदेपालटही होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 31, 2017, 05:45 PM IST
केंद्रीय मंत्रिमंडळाचा अल्पावधीतच विस्तार; इन-आऊट बद्धल उत्सुकता title=

नवी दिल्ली : होणार होणार म्हणून गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चिन्हे आहेत. येत्या ३ सप्टेंबरला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा नेमका विस्तारच असेल की त्यात खांदेपालटही होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीतील सत्ताधारी वर्तुळातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, अनेकांची धागधूग वाढली आहे. मंत्रीमंडळ विस्तार हा सर्वसामान्य असेन की, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा धक्कातंत्राचा वापर करत अनेकांना डच्चू देणार याबाबत उत्सुकता आहे. तसेच, आहे त्या मंत्रिमंडळातील खात्यांची आदलाबदल होणार की, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबतही उत्सुकता आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शुक्रवार (१ सप्टेबर ) आणि शनिवारी (२ सप्टेबर) तिरूपती बालाजीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरून परतताच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. रेडिफ डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रपती दिल्लीला रविवारी (३ सप्टेबर) परतत आहेत. मात्र, त्यापूर्वी ते श्री वराहस्वामी मंदिरात पूजा करणार आहेत. त्यामुळे शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रविवार दुपारनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३ ते ५ सप्टेबर या कालावधीत चालणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाणा होत आहेत.

दरम्यान, भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी (३१ ऑगस्ट) ज्येष्ठ मंत्री आणि नेत्यांची एक बैठक घेतली. या बैठकीला अरूण जेटली, नरेंद्र सिंह तोमर, पी. पी. चौधरी, जितेंद्र सिंह, निर्मला सितारामन हे मंत्री उपस्थित होते. या बैठकीला ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव हेही उपस्थित होते. या बैठकीत आगामी गुजरात विधानसभा निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर राजधानी दिल्लीत राजकीय वातावरणात चांगल्याच हालचाली सुरू झाल्या आहेत.