मोदी राजकारणात माझे ज्युनिअर, पण अहंकार दुखावला जाऊ म्हणून सर म्हणायचो- चंद्राबाबू नायडू

मी नरेंद्र मोदींचा अहंकार दुखावण्याच्या फंदात पडलो नाही.

Updated: Jan 31, 2019, 04:06 PM IST
मोदी राजकारणात माझे ज्युनिअर, पण अहंकार दुखावला जाऊ म्हणून सर म्हणायचो- चंद्राबाबू नायडू title=

अमरावती: काही दिवसांपूर्वीच भाजपप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तेलुगू देसम पक्षाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी राजकाणात माझे ज्युनिअर (कनिष्ठ) आहेत. मात्र, आंध्र प्रदेशच्या हितासाठी मी नरेंद्र मोदींचा अहंकार दुखावण्याच्या फंदात पडलो नाही. राज्याच्या भल्यासाठी मी शक्य ते सर्व करत आहे. जेव्हा मी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भेटीला गेलो होतो तेव्हा तेव्हा मी त्यांना मि. क्लिंटन, अशी हाक मारली होती. मात्र, राजकारणात मला ज्युनिअर असलेल्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान झाल्यावर मी दहावेळा सर म्हणून संबोधले. जेणेकरून त्यांचा अहंकार संतुष्ट होईल आणि आंध्र प्रदेशला न्याय मिळेल. २०१४ साली याच कारणासाठी मी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता भाजपची साथ सोडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत टीडीपीला आणखी १० जागा मिळतील, असा विश्वासही चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला. 

स्वत:च्या मुलांवर प्रेम असेल, तर मोदींना नव्हे 'आप'ला मतं द्या- केजरीवाल

गेल्यावर्षी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या कारणावरून चंद्राबाबू यांनी 'एनडीए'तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

दरम्यान, कालच्या बैठकीत चंद्राबाबू यांनी गुजरात दंगलीचाही उल्लेख केला. गोध्रा दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्वप्रथम मी केली होती. बहुधा त्यामुळेच माझ्यासोबत पक्षपात झाला असावा. मोदी सरकार सीबीआय, ईडी आणि अन्य यंत्रणांचा वापर करून राजकीय प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य करत असल्याची टीकाही यावेळी चंद्राबाबू यांनी केली.