CBSE : 10 वी, 12वीचा निकाल कसा आणि कधी लागणार?

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सीबीएसईने (CBSE) बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी ईवॅल्यूएशन क्राइटेरिया लावले आहेत.

Updated: Jun 17, 2021, 01:35 PM IST
CBSE : 10 वी, 12वीचा निकाल कसा आणि कधी लागणार?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सीबीएसईने (CBSE) बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी ईवॅल्यूएशन क्राइटेरिया लावले आहेत. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या वतीने अटॉर्नी जनरल यांनी सांगितले की, कोणत्या आधारावर बारावीचे विद्यार्थी उत्तीर्ण होतील.

अ‍ॅटर्नी जनरल यांनी कोर्टाला सांगितले की, "दहावीसाठी 5 विषय घेण्यात येणार आहेत आणि त्यांपैकी चांगले मार्क मिळालेल्या 3 विषयांना मार्क देण्यासाठी ग्राह्य धरले जाईल. इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही दहावीच्या मार्कांमधील 30 टक्के, 11 वीच्या मार्कांमधील 30 टक्के आणि 12 वी मधील प्रॅक्टीकल्स आणि युनीट टेस्ट इत्यादीमधून 40 टक्के घेणार आहोत आणि या सर्वांची सरासरी काढून 12 वीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाईल."

तसेच सीबीएसईने कोर्टाला सांगितले की,12 वीचा निकाल 31 जुलै 2021 पर्यंत जाहीर केला जाईल.

सीबीएसईने 4 जून रोजी समितीची स्थापना केली

4 जून 2021 रोजी सीबीएसईने ईवॅल्यूएशन क्राइटेरिया ठरवण्यासाठी 13-सदस्यांची बैठक बसवली होती. बारावीचे मूल्यांकन धोरण ठरवण्यासाठी या समितीला दहा दिवसांची मुदत देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने मूल्यमापन निकष ठरवण्यासाठी केंद्र सरकार आणि सीबीएसईला दोन आठवडे दिले होते. त्याच पार्श्व भूमीवर ही समीती तयार करण्यात आली होती.