CBSE 10th Result 2023: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, 'या' लिंकवर पाहा रिझल्ट!

CBSE Class 10th Result 2023: जाहीर झालेल्या निकालानुसार, महाराष्ट्राचा निकाल हा 96.92 टक्के लागला असून, यंदाही नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारल्याचं दिसून आलंय. केरळच्या त्रिवेंद्रम जिल्ह्याने यंदाच्या वर्षी सर्वाधिक टक्केवारी घेतली.

Updated: May 12, 2023, 03:59 PM IST
CBSE 10th Result 2023: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, 'या' लिंकवर पाहा रिझल्ट! title=
CBSE Class 10 Result

CBSE Board 10th Result Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने यंदाच्या वर्षातील इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. बारावी पाठोपाठ दहावीचा देखील निकाल जाहीर केला. या निकालामध्ये दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल 1.28 टक्क्यांनी घसरल्याचं पहायला मिळतंय.

5 एप्रिल 2023 पासून 10 वी आणि 12 वीची सीबीएससी बोर्ड परीक्षा घेण्यात आली होती. या वेळी 10 वीच्या परीक्षेला 20,93,978 विद्यार्थी बसले होते त्यातील 19,76,668 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्याची माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

जाहीर झालेल्या निकालानुसार, महाराष्ट्राचा निकाल हा 96.92 टक्के लागला असून, यंदाही नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारल्याचं दिसून आलंय. केरळच्या त्रिवेंद्रम जिल्ह्याने यंदाच्या वर्षी सर्वाधिक टक्केवारी घेतली. त्रिवेंद्रम जिल्ह्याचा निकाल 99.91 टक्के इतका लागला आहे.

या लिंकवर पाहा तुमचा निकाल

cbseresults.nic.in
results.cbse.nic.in
cbse.nic.in
cbse.gov.in

digilocker.gov.in
results.gov.in

दरम्यान, वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

रिझल्ट कसा चेक कराल?

क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल.

उमेदवारांना या पेजवर त्यांचे लॉगिन तपशील भरावा लागणार आहे.

रोल नंबर आणि जन्मतारीख भरून सबमीट करा.

त्यावेळी तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

त्यानंतर आता त्याची प्रिंट काढून सोबत ठेऊ शकता.  

SMS करा आणि निकाल पाहा

विद्यार्थ्यांनी 10 रोल नंबर स्कूल नंबर सेंटर नंबर टाईप करून 7738299899 या क्रमांकावर पाठव्यास तुम्हाला तुमचा निकाल एसएमएसद्वारे पहायला मिळू शकतो. विद्यार्थ्यांमधील स्पर्धा कमी करण्यासाठी इयत्ता 12 वी आणि इयत्ता 10 वी मधील टॉपर्स आणि मेरीट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. 

दरम्यान, तृतीयपंथी विद्यार्थ्यांची संख्या देखील जास्त होती. तृतीयपंथी विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 90 टक्के आहे. त्यामुळे अनेकांनी पेढे वाटून कौतूक देखील केलंय.