'दृष्यम' स्टाईल हत्येचं शेवटचं CCTV आलं समोर; महिला जीममध्ये फिरताना कैद; पुढे जे झालं ते अंगावर थरार आणणारं

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) जीम ट्रेनरने हत्या करण्यापूर्वीचे महिलेचे अखेरचे क्षण सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाले आहेत. हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह व्हीव्हीआयपी परिसरात पुरला होता.   

शिवराज यादव | Updated: Oct 27, 2024, 06:42 PM IST
'दृष्यम' स्टाईल हत्येचं शेवटचं CCTV आलं समोर; महिला जीममध्ये फिरताना कैद; पुढे जे झालं ते अंगावर थरार आणणारं  title=

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) जीम ट्रेनरने महिलेची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यानंतर पीडित महिला आरोपीचं लग्न ठरल्याने नाराज होती. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून त्याने महिलेची हत्या केली. आरोपीने महिलेचा मृतदेह कानपूरच्या जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांच्या बंगल्यातील परिसरात पुरला होता. व्हीव्हीआयपी परिसरात मृतदेह पुरला असल्याने पोलिसांना गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 4 महिने लागले. यादरम्यान महिलेच्या हत्येपूर्वीचे अखेरचे क्षण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 

दृष्यम पाहून विवाहित प्रेयसीची हत्या, थेट DM च्या घराबाहेर पुरला मृतदेह, 4 महिने पोलीस शोधत राहिले; शेवट काय झाला पाहा

 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला जीममध्ये लाल रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घालून फिरताना दिसत आहेत. यानंतरच महिलेची हत्या करण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय?

उद्योगपती राहुल गुप्ता यांची पत्नी एकता गेल्या 4 महिन्यांपासून बेपत्ता होत्या. या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी एका जीम ट्रेनरला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 24 जूनची आहे. आरोपीचं नाव विमल सोनी असून तो जीम ट्रेनर आहे. पोलिसांनी त्याला शनिवारी बेड्या ठोकल्याा. विमल हाय प्रोफाईल ट्रेनर आहे, जो अनेक अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देतो. हत्या केल्यानंतर त्याने पोलिसांना सुगावा लागू नये यासाठी कानपूरच्या जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांच्या बंगल्यातील परिसरात मृतदेह पुरला होता. 

डीसीपी श्रवण कुमार सिंह यांनी सांगितलं  की, "24 जून रोजी घटना घडली आहे. पीडित महिला आरोपीच्या जीममध्ये ट्रेनिंगला जात असेल. आरोपीचं लग्न ठरलं असल्यान ती कथितपणे नाराज होती. यामुळेच आरोपीशी तिचा मोठा वाद झाला होता".

त्यांनी सांगितलं की, "घटनेच्या दिवशी पीडित महिला जवळपास 20 दिवसांनी जिमला आली होती. ट्रेनर तिला कारमधून घेऊन गेला होता. कारमध्ये दोघांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी आरोपीने पीडितेच्या गळ्यावर जोरात बुक्की मारली, ज्यानंतर ती बेशुद्ध पडली".

मृतदेह पुरण्यासाठी खोदला खड्डा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "महिला बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिची हत्या केली आणि मृतदेह पुरुन टाकला". महिलेचा मृतदेह पुरण्यासाठी त्याने एक खड्डा खोदला होता असंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

आरोपीने तपासादरम्यान दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण कसून चौकशी करण्यात आली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हत्येआधी आपण अनेकदा दृष्यम चित्रपट पाहिला होता. यामुळे न्याय दंडाधिकाऱ्यांच्या परिसरात मृतदेह पुरला असंही त्याने सांगितलं. 

आरोपीने मोबाईल वापरलाच नाही

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना फार मेहनत घ्यावी लागली. याचं कारण हत्येदरम्यान आरोपी मोबाईलचा वापरच करत नव्हता. यामुळे त्याची माहिती मिळवताना पोलसांना फार प्रयत्न करावे लागले. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत. 

पोलिसांनी एकताचा मृतदेह मिळवला आहे. त्याचा पूर्ण सांगाडा झाला आहे. तीन तास खोदकाम केल्यानंतर मृतदेह सापडला. पोलिसांनी सध्या सांगाडा शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दुसरीकडे महिलेच्या पतीने पोलिसांवर बेजबाबदारपणे वागल्याचा आरोप केला आहे.