नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू (Covid Death Cases) झाल्यास नातलगांना आर्थिक मदत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आता 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत विविध योजनांअंतर्गत केंद्र आणि राज्यांकडून आधीच दिल्या जाणाऱ्या मदतीव्यतिरिक्त असेल. आरोग्य मंत्रालय आणि एनडीएमए (NDMA) राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील
भरपाईची रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. भरपाईसाठी अर्ज दाखल केल्याच्या तीस दिवसांच्या आत ही रक्कम कुटुंबातील सदस्यांना द्यावी लागेल. प्रत्येक लाभार्थीची माहिती प्रकाशित करणं आवश्यक असेल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की केवळ मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूच्या कारणाची नोंद न केल्यामुळे, भरपाई नाकारता येत नाही. आर्थिक साहाय्य देण्याची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शकरीत्या पार पाडण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा प्राधिकरणांची राहील.
आरटीपीसीआर चाचणीत कोविडची पुष्टी झाल्याच्या तीस दिवसांच्या आत जर रुग्णाचा मृत्यू झाला तर अशा रुग्णाचं कुटुंब भरपाई मिळण्यास पात्र ठरेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. घरी किंवा रुग्णालयात, मृत्यूच्या दोन्ही प्रकरणांमध्ये भरपाई दिली जाईल.
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 151/9
|
VS |
SIN
155/7(19.1 ov)
|
| Singapore beat Indonesia by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.