Good News : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची चांगली वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर पोहोचला आहे.  . 

सुरेंद्र गांगण | Updated: Feb 19, 2019, 10:53 PM IST
Good News : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची चांगली वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सध्याच्या ९ टक्क्यांवरून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील महागाई भत्ता १२ टक्के होणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्याचा फरकही मिळणार आहे. नवी वाढ १ जानेवारी २०१९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. त्यामळे या महागाई भत्तावाढीमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला ९,२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. 

महागाई भत्त्यातील या वाढीचा लाभ एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तधारकांना मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याव्यतिरिक्त तिहेरी तलाक विधेयक आणि कंपनी लॉ सुधारणा विधेयकावरील अध्यादेशालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. त्यामुळे ही विधेयक मार्गी लागण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे. तिहेरी तलाक विधेयक गेल्या वर्षी २७ डिसेंबरला लोकसभेत मंजूर झाले. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नव्हते. त्यामुळे त्यावरील अध्यादेश काढण्यात आला, आहे अशी माहिती देण्यात आली. 

याशिवाय अनरेग्युलेटेड डिपॉझिट्स स्कीम्सवरही बंदी आणण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती यावेळी अरुण जेटली यांनी दिली.