Rahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी आता बेघर होणार; केंद्र सरकारचा आणखी एक धक्का

Rahul Gandhi : केंद्र सरकारने राहुल गांधींना शासकीय बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली आहे. 22 एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्याचे आदेश केंद्र सरकारने या नोटीसमध्ये दिले आहेत. यामुळे राहुल गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे.

Updated: Mar 27, 2023, 06:19 PM IST
Rahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी आता बेघर होणार; केंद्र सरकारचा आणखी एक धक्का title=

Rahul Gandhi :  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी ( Member of Lok Sabha) रद्द करण्यात आली आहे. यानंतर  केंद्र सरकारचा राहुल गांधींना आणखी एक धक्का दिला आहे. केंद्र सरकार राहुल गांधींवर आणखी एक कारवाई केली आहे. यामुळे बेघर होऊन राहुल गांधी रस्त्यावर येणार आहेत. 

केंद्र सरकारने राहुल गांधींना शासकीय बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली आहे. 22 एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्याचे आदेश केंद्र सरकारने या नोटीसमध्ये दिले आहेत. यामुळे राहुल गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे.

राहुल गांधींची खासदराकी का रद्द करण्यात आलेय?

2019 मध्ये कर्नाटक निवडणुकीदरम्यान एका रॅलीत भाषण देताना राहुल गांधी यांनी  एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या रॅलीत बोलताना त्यांनी 'सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?' असं प्रश्न केला होता. 5 वर्षानंतर निकाल देताना सूरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांनी 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर  लोकसभा (Lok Sabha) सचिवालयाने दुसऱ्याच दिवशी अधिसूचना काढून राहुल गांधी यांना अपात्र ठरवले. सुरत कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकसभा सचिवायलानं हा निर्णय घेतलाय. यामुळे राहुल गांधींना मोठा झटका बसलाय. त्यांना आता पुढील सहा वर्षं निवडणूक लढवता येणार नाही. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 

काँग्रेस मुख्यालयावर बुलडोझर फिरवला

राहुल गांधींची खासदराकी रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने काँग्रेस मुख्यालयावरही (Congress headquarters) बुलडोझर (JCB) फिरवला. शुक्रवारी काँग्रेस मुख्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय बांधल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या नवीन कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) ही कारवाई केली. काँग्रेसच्या या मुख्यालयात बांधलेल्या तीन पायऱ्या अतिक्रमणामध्ये  येत असल्याने बांधकाम विभागाने बुलडोझरने त्या तोडल्या आहेत. यानंतर आता थेट राहुल गांधींना बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.