पैशाला आपल्या आयुष्यात काय स्थान असावं? काय सांगते चाणक्य नीती, जाणून घ्या

चाणक्या नीती सांगते की, पैसा तुमचे जीवन सोपं करतं, तसेच यामुळे समाजात तुम्हाल सन्मानही मिळतो.

Updated: Mar 5, 2022, 04:09 PM IST
पैशाला आपल्या आयुष्यात काय स्थान असावं? काय सांगते चाणक्य नीती, जाणून घ्या title=

मुंबई : पैसा हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. यासाठीच लोक मेहेनत करतात आणि तुमच्याकडे जितका जास्त पैसा तितकतं तुमचं आयुष्य सुखी असं लोकांचं माननं आहे आणि हे काही प्रमाणात खरं देखील आहे. परंतु चाणक्या नीती पैशांच्याबाबतीत आपल्याला काही वेगळंच सांगते. चाणक्य नीती पैशांकडे माणसाचा एक मित्र मानते. जो माणसाच्या चांगल्या वाईट काळात नेहमीच लोकांना मदत करतो. ज्याच्या येण्याणे लोकांचं सर्व दुख आणि टेन्शन दुर होतं.

चाणक्य नीती सांगते की, पैसा तुमचे जीवन सोपं करतं, तसेच यामुळे समाजात तुम्हाल सन्मानही मिळतो. त्यामुळे पैशाचा आव आणू नका. तो फक्त आवश्यक ठिकाणी खर्च करा.

जर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करायचा नसेल, तर तुमच्या मित्राला जास्त खर्च करू नका म्हणजेच उत्पन्नापेक्षा जास्त पैसे कधीही खर्च करू नका. जे लोक अनावश्यक गोष्टींमध्ये पैसे वाया घालवतात त्यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात.

परंतु चाणक्य नीती हे देखील म्हणते की, तुमच्याकडे जर जास्त पैसा असेल, तर त्याला साठवून ठेऊ नका. त्याला जमीन, सोने इत्यादींमध्ये गुंतवावा, ज्यामुळे वेळ आल्यावर हे पैसे तुम्हाला मोठा नफा मिळवून देतील.

तसेच जास्त पैसा असेल, तर त्याचा कल्याण कार्यात वापर करा. यातून गरीब आणि आजारी लोकांना मदत करा. याशिवाय मंदिर किंवा धार्मिक स्थळी दान करा. यामुळे जीवनात सकारात्मकता येते आणि देवाची कृपा प्राप्त होते.

पैशाची कमतरता नसेल, तर पैसा सामाजिक कार्यात खर्च करावा. पैसे, हॉस्पिटल, शाळा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून लोकांना मदत करावी. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढते आणि तुम्हाला नशीब मिळते.